Wednesday, July 17, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणसिंधुदुर्ग जिल्हा कोरोना मुक्त

सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना मुक्त

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव सक्रिय रुग्ण सुद्धा बरा झाल्याने जिल्हा शुक्रवारी कोरोनामुक्त झाला. जिल्ह्यात गेल्या ८ दिवसांपासून नव्याने एकही कोरोना बाधित रुग्ण सापडला नाही. तसेच एकमेव सक्रीय रुग्ण होता, तोही आज कोरोनामुक्त झाल्याने जिल्हा आज कोरोना मुक्त झाला. सिंधुदुर्ग जिल्हा वासियांनी जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत वेळोवेळी केलेल्या काटेकोर कोविड प्रतिबंधक नियमांच्या पालनामुळे आणि सहकार्यामुळे आज जिल्हा कोरोनामुक्त झाला असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

जिल्ह्यात मार्च २०२० मध्ये पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. तत्पूर्वीच जिल्ह्यामध्ये पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी कोरोनाचा जिल्ह्यात शिरकाव होऊ नये यासाठी काटकोरपणे पावले उचलली होती. रुग्ण आढळल्यास त्यावरील उपाययोजनांबाबत खबरदारी घेण्यासाठी कोविड सेंटर्सची तयारीही ठेवण्यात आली होती. जिल्ह्यामध्ये कणकवली, सावंतवाडी, जिल्हा रुग्णालय ओरोस येथे ऑक्सिजन जनरेशन प्लांट, कुडाळमध्ये रिफिलिंग प्लांट उभारण्यात आले होते. त्याचबरोबर कोविड काळजी केंद्रे, कोविड आरोग्य केंद्रे यांचीही उभारणी करण्यात आली होती. पालकमंत्री श्री. सामंत आणि जिल्हा प्रशासन यांनी केलेल्या आवाहनाला जिल्हावासियांनीही सकारात्मक प्रतिसाद देत कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन केले होते. त्यामुळेच जिल्हा कोरोनामुक्त झाला.

सिंधुदुर्ग जिल्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यांनतर सुरुवातीला कोरोनाचे रुग्ण फार कमी होते. दुसऱ्या लाटेत रुग्ण मोठ्या वाढले. मृत्यूही वाढले. त्यामुळे दोन वर्षात तब्ब्ल ६ लाख ३० हजार ५४७ चाचण्या करण्यात आल्या. त्यात एकूण ५७ हजार ३७९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यापैकी एकूण ५५ हजार ८४७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर १ हजार ५३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याच बरोबर कोव्हीड लसीकरणात देखील सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवर असून ९७ टक्के लसीकरण पूर्ण झालं आहे.लसीकरणात राज्यात पहिल्या पाच जिल्ह्यात सिंधुदुर्गचा समावेश आहे. ६ लाख ५१ हजार ९६८ जणांपैकी ६ लाख ३४ हजार ४२ लोकांनी पहिला डोस घेतला असून हे प्रमाण ९७ टक्के आहे. तर ५ लाख २८ हजार १३९ लोकांनी दुसरा डोस घेतला असून हे प्रमाण ८१ टक्के आहे.

‘त्यांनी’ केलं दोन वर्ष एकही सुट्टी न घेता काम

कोरोनाच्या गेल्या दोन वारशाच्या काळात जशी आरोग्य, महसूल व पोलीस यंत्रणा कोरोना रोखण्यासाठी जीव तोडून काम करत होती, तशाच पद्धतीने पडद्यामागे राहून काम करणारी एक यंत्रणासुद्धा होती. यामध्ये कोरोना काळात सलग दोन वर्ष एकही सुट्टी न घेता कोरोनाची सांख्यिकी माहिती गोळा करून जिल्हाधिकाऱ्यांपासून शासन स्तरावर रिपोर्टींग करण्याचे काम जिल्हा साथरोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत सवदी यांनी सांभाळले. त्यांना डॉ. राजेश पालव, संतोषी धुरी, किशोर लाड, दिलीप मळये आणि सुनील ढोणुक्षे या कर्मचाऱ्यांनी सतत सेवा देऊन साथ दिली. हे खूप महत्वाचे आणि कौतुकास्पद आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -