Tuesday, December 3, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेनाले, छोटी गटारे नियमित स्वरूपात स्वच्छ करा

नाले, छोटी गटारे नियमित स्वरूपात स्वच्छ करा

कल्याण पालिका आयुक्तांचे निर्देश

कल्याण (प्रतिनिधी) : कायापालट अभियानांतर्गत महापालिका परिसरातील रस्त्यांची साफसफाई करण्याबरोबरच, येऊ घातलेला पावसाळा लक्षात घेता लहान नाले व छोटी गटारे नियमित स्वरुपात साफ करुन घेणेबाबतचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व प्रभागांच्या सहा. आयुक्त यांना दिले आहेत. त्या आनुषंगाने शुक्रवार सकाळपासूनच १/अ प्रभागाचे सहा. आयुक्त सुहास गुप्ते यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या मदतीने अंतर्गत नाल्यांची साफसफाई करण्यास सुरुवात केली.

त्याचप्रमाणे ३/क प्रभागातही सहा. आयुक्त सुधिर मोकल यांनी कल्याण पश्चिम परिसरात आरोग्य निरिक्षक जगन्नाथ वड्डे व इतरांच्या मदतीने संतोषी माता रोड – सहजानंद चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक – महमंद अली चौक – म. फुले चौक तसेच कल्याण स्टेशन परिसर,गावदेवी रोड, लालचौकी रोड, सुभाष नगर रोड, दुध नाका,राममारूती रोड, निक्की नगर, चौधरी मोहल्ला, आधारवाडी चौक, व मेन रोड परिसरातील साफसफाई करून घेतली आणि जोशीबाग परिसरातील ,पंचमुखी परिसरातील तसेच अन्सारी चौक येथील गटारातील गाळ काढून साफ करण्याची कारवाई घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यायांमार्फत करुन घेतली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -