Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीप्रवीण दरेकरांना पोलिसांची पुन्हा नोटीस

प्रवीण दरेकरांना पोलिसांची पुन्हा नोटीस

बनावट मजूर प्रकरणी उद्या होणार चौकशी

मुंबई (प्रतिनिधी): विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांदा नोटीस पाठवली आहे. माता रमाबाई आंबेडकर पोलिस ठाण्यात हजर राहण्याची सूचना दरेकर यांना नोटीसीमार्फत करण्यात आली आहे. चौकशीसाठी ११ एप्रिल रोजी पुन्हा एकदा पोलिस ठाण्यात हजर राहा, असे आदेश नोटीसीतून देण्यात आले आहेत. मुंबै बँक बनावट मजूर प्रकरणी ही नोटीस दिली गेली आहे. प्रवीण दरेकर यांची आठवड्याभरापूर्वी माता रमाबाई आंबेडकर नगर पोलिस ठाण्यात मुंबै बँक बनावट मजूर प्रकरणात चौकशी झाली होती.

जवळपास चार ते पाच तास पोलिसांनी प्रवीण दरेकर यांची चौकशी केली होती. त्यावेळी गरज वाटल्यास पुन्हा बोलविण्यात येईल, असे पोलिसांनी दरेकरांना सांगितले होते. दरेकरांनीही पोलिसांचे म्हणणे मान्य केले होते. आता ११ तारखेला पोलिसांच्या नोटीसीनुसार दरेकरांना पुन्हा चौकशीसाठी जावे लागणार आहे. मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणी प्रवीण दरेकर यांची याआधी ४ एप्रिल रोजी मुंबईतील रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये सुमारे चार तास चौकशी करण्यात आली होती. यादरम्यान त्यांना विविध प्रश्न विचारले गेले.

चौकशी संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पोलिसांनी नियबाह्य प्रश्न विचारल्याचा आरोप केला. तसेच सरकारचा पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव असल्याचेही ते म्हणाले होते.प्रत्यक्षात मजूर नसतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे तसे दाखवून आणि १९९९ पासून २०२१ पर्यंत मुंबै बँकेच्या संचालक मंडळावर मजूर प्रवर्गातून निवडून येऊन नागरिकांबरोबरच सरकारचीही फसवणूक केली, अशा आरोपाखाली एफआयआर दाखल झाल्याने प्रवीण दरेकर अडचणीत आले आहेत. आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र सचिव धनंजय शिंदे यांच्या तक्रारीवरून माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास प्राथमिक टप्प्यात असतानाच दरेकर यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -