Friday, May 9, 2025

तात्पर्यसंपादकीयमहत्वाची बातमी

संगणक क्षेत्रात असणारी नवनवीन आव्हाने

संगणक क्षेत्रात असणारी नवनवीन आव्हाने व त्याकरिता आवश्यक असणारे मनुष्यबळ आणि विषयातील नैपुण्य


गेली सुमारे साडे तीन दशकं भारतामधील संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे व दिवसेंदिवस वाढतोच आहे. पहिल्या दशकात संगणकाचा प्रचार व प्रसार झाला. सामान्य लोकांना संगणक समजायला लागलं. दुसऱ्या दशकामध्ये संगणक शिक्षण घेणारी मोठी पिढी निर्माण झाली. हे मी जे लिहितोय ते संगणकतज्ज्ञ मंडळींबाबत नाही, तर संगणकाचे जुजबी ज्ञान असणाऱ्या मंडळींबाबत आहे. संगणक साक्षरता. तिसरे दशक संपले, त्या दशकाने संगणक क्षेत्रातील असणाऱ्या नवनवीन आव्हानांची जाणीव करून दिली.


आता हे जे चौथे दशक आहे, या दशकात नवनवी आव्हाने पूर्ण शक्तिनिशी पेलण्याची क्षमता विकसित करण्याकरिता वापरावयाचे आहे आणि या क्षेत्रात जितके करू तितके थोडेच. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्यांकरिता प्रचंड वाव आहे. त्याच प्रमाणात रोजगारनिर्मितीही होत आहे आणि पुढेही होत राहणार आहे. त्याकरिता विषयाची व्याप्ती व मर्यादा यांचा अभ्यास करणे हे अत्यंत गरजेचे आहे.


खरे पाहता, संगणक या विषयाची व्याप्ती ही सिमातीत आहे. म्हणजे ज्याला सीमा नाही तसेच या क्षेत्राला मर्यादाही नाहीत. आज ज्ञात असणारे असे कोणतेही क्षेत्र नाही ज्यात संगणकाचा वापर होत नाही. अगदी लहान किराणा दुकानापासून, तर उपग्रह संचालन करण्यापर्यंत, कलाक्षेत्रापासून तर हवामान अंदाज, विशिष्ट क्षेत्रातील पीक परिस्थिती अवलोकन व आडाखे बांधणे (Forecast) ही त्यातील काही उदाहरणे. असे जरी असले तरीसुद्धा संगणक क्षेत्रात सक्रिय पदार्पण करावयाचे असल्यास नेमके क्षेत्र ठरवून अभ्यास व सराव केल्यास नैपुण्य मिळविता येईल व असे करणेच अगत्याचे आहे. आता ज्या क्षेत्राची व्याप्ती असीम आहे व ज्याला मर्यादा नाहीत, त्या विषयात प्रावीण्य मिळवून पदार्पण केल्यास ते स्वतःच्या तसेच समाज व राष्ट्राच्या विकासाकरिता तसेच रोजगार निर्मितीकरिता मोठ्या प्रमाणात हातभार लावणारे ठरेल.


आता बघू या आवश्यक असणाऱ्या विविध संगणक क्षेत्रातील उपलब्ध संधींची माहिती.


Computer Hardware : दिवसेंदिवस संगणक हा क्षमतेच्या दृष्टीने नियमित विकसित होत आहे. (जसे processor Speed, increasing Storage capacity, maximum Utilization of resources, Reusability, Multi Tasking, multi threading, reduction in overheads by using advance techniques and many more)

येणाऱ्या काळाची आव्हाने


१. संपूर्णत: आत्मनिर्भर होणे : यामध्ये computer Hardware आणि Computer Software. आपणा सर्वांना हे ज्ञात आहे की, महासत्ता किंवा विकसित देशांनी भारताला महासंगणक देण्यास नकार दिला होता. त्यावेळी भारतातील वैज्ञानिक विद्यार्थ्यांनी श्री विजय भाटकर यांच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली ‘परम’ महासंगणक इथेच तयार केला.


२. Computer Software : या क्षेत्रात भारत व भारतीय कंपन्या सदैव घोडदौड करीत असून या क्षेत्रातील भारताचे स्थान अग्रेसर आहे.


३. Computer resources : या क्षेत्रात जरी आपण १००% स्वयंपूर्ण नसलो तरी बरेच अंशी आपली वाटचाल स्वयंपूर्ण होण्याकडे आहे.


४. तज्ज्ञ मनुष्य बळ निर्मिती : आनंदाची गोष्ट म्हणजे या क्षेत्रातही आपण बरेच पुढे आहोत. इतकेच नव्हे तर भारतीय तज्ज्ञांनी मानाचे स्थान कायम ठेवले आहे. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत अनेक असे अनेक अभ्यासक्रम, यापैकी काही पूर्णतः निःशुल्क अथवा अत्यल्प शुल्कात शिकविले जातात. वेग वेगळ्या कंपन्या, त्यांच्या वेबसाइटच्या माध्यमातून असे कित्येक अभ्यासक्रम चालवित आहेत. त्यातील योग्य अभ्यासक्रम निवडून ते केले पाहिजेत. तसेच यूट्यूबच्या माध्यमातूनही असे अनेक शैक्षणिक चॅनल्स उपलब्ध आहेत. त्यांचादेखील वापर करता येईल. आपण जर या क्षेत्रातील तज्ज्ञ नसलात तरी या अभ्यासक्रमाच्या माध्यमांचा वापर करून या क्षेत्रात भवितव्य घडविणे अतिशय सोपे झाले आहे. फक्त सातत्यपूर्ण प्रयत्न असावे, एवढी एकच बाब महत्त्वाची आहे.


निवडता येणारे विषय


१. E Commerce.
२. Web Designing
३. Computerised Accounting
४. Mobile App Designing
५. Desk Top Publishing


ही झाली काही सोप्या अभ्यासक्रमांची उदाहरणे. आता बघू या थोडे अजून अभ्यासक्रम, ज्यात अधिक संधी उपलब्ध आहेत.


१. कॉम्प्युटर प्रोग्रामिंग : यामध्ये संगणकाच्या विविध भाषा जसे C, C++, Python Java, R, Swift, Go आणि अशाच संगणकाच्या अनेक भाषा. या भाषा निवडत असताना कोणत्या भाषा दीर्घकाळ चालणार आहेत याची माहिती तज्ज्ञ मंडळींकडून घ्यावी. वर उल्लेखलेल्या जवळजवळ सर्वच भाषा या दीर्घकाळ वापर होऊ शकणाऱ्या आहेत तसेच नित्य वापरल्या जात आहेत. C आणि C++ या भाषा तर गेल्या ३० वर्षांपासून अजूनही वापरल्या जात आहेत. सध्या सुरू असणाऱ्या प्रयोगानुसार संगणक क्षेत्रात संस्कृत ही भाषा वापरल्यास संगणकाची गती तर वाढेलच ज्याद्वारे एखादे काम संपूर्ण होण्याकरिता लागणाऱ्या वेळेची बचत होईल. सध्या या संस्कृत भाषेचा वापर संगणक क्षेत्रात करता यावा याकरिता प्रयोग सुरू आहेत व थोड्याच काळात या प्रयोगास यश मिळेलच याची खात्री वाटते.


२. Data Science, Algorithms, Data Mining : सध्याचे जग हे माहितीचे असून अनेक क्षेत्रांतील प्रचंड माहितीचा सागर जागतिक संगणक महाजालात तयार झाला आहे. त्यातून एखादी विशिष्ट माहिती शोधणे व तिचा योग्य ठिकाणी वापर करता येणे याकरिता त्या विषयातील तज्ज्ञांना पुष्कळ वाव आहे.


३. Artificial, Intelligence (A.I.), Machine Learning, Knowledge Based Systems (K.B.S.) या आधुनिक संगणकीकरण युगातील(AI) हादेखील एक महत्त्वाचा विषय आहे.


४. Robotics, nural networks : यंत्रमानव ही तर या शतकातील अत्यंत महत्वाची उपलब्धी असून या क्षेत्रातील तंत्रज्ञ हे पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध नाहीत.


५. Ithical Hacking, Cyber foransik, Cyber Law : दैनंदिन कामकाज करीत असताना बातम्यांद्वारे आपणाला संगणकीय घोटाळे वा ऑनलाइन फसवणुकीचे वृत्त वाचायला मिळते. हे सर्व कसे घडते, कुठून घडले, कोणत्या तंत्राचा वापर यात केला गेला याचा शोध घेण्याकरिता असलेला हा विषय आहे. यात काम करण्याकरिता अनेक तज्ज्ञांची आज मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे.


६. Fire walls, Malware detection & protection, Computer vaccines.


७. Internet of Things (IOT) यामधील काही अभ्यासक्रमांना संगणकाचे थोडेफार शास्त्रीय ज्ञान असणे आवश्यक असले तरी शिकून आत्मसात करता येतील असे हे अभ्यासक्रम आहेत. या दशकात प्रचंड गतीने आपण पुढेच जात आहोत हे निःसंशय, निर्विवाद सत्य आहे. आपल्याला शक्य असणारे व आवड असलेले अभ्यासक्रम निवडा आणि व्हा तय्यार आव्हाने स्वीकरण्याकरिता, कारण या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी द्वार उघडून आपली वाट बघत आहेत.

Comments
Add Comment