ठाणे (प्रतिनिधी) : आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित होत असलेल्या जांभळी नाका येथील शिवाजी मैदान चैत्रनवरात्रोत्सव २०२२ भक्ती व कला महोत्सवाच्या सहाव्या दिवशी समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पुरुषांना नवरत्न व महिलांना नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच कोरोना महामारी च्या काळात आपला जीव धोक्यात घालून ज्या कोरोना योद्ध्यांनी आपल्या कुटुंबाची ही काळजी न करता समाजासाठी उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींचाही विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
या पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालक मंत्री एकनाथ शिंदे तसेच महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे, खासदार विनायक राऊत, आमदार रवींद्र फाटक, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा, अभिनेत्री सुचित्रा बांदेकर उपस्थित होते. नवरत्न पुरस्कार मानकऱ्यांमध्ये निनाद प्रधान, अशोक बागवे, दीपक सावंत, समीर जयंत गुप्ते, चंद्रशेखर त्र्यंबक महाशब्दे, शशि देशमुख, दिलीप पोरवाल, प्रदीप सदाशिव केळकर यांचा समावेश आहे.
तर वर्षा कोल्हटकर, अंजली आमडेकर, रेश्मा कारखानीस, संगीता विवेक कुलकर्णी, योजना विकास घरात, सुमिता सुरेंद्र दिघे, डॉ. ज्योती शंकर परब, गीता जैन, मणी नायर, कॅटलीन परेरा, सिस्टर अॅनी फर्नांडीस यांना नवदुर्गा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच, सिव्हील सर्जन डॉ. कैलास पवार, डॉक्टर नवरीश सय्यद, डॉक्टर स्वाती शिंदे, डॉक्टर अमृता बाविस्कर, परिचारिका कलावती माने, सुषमा कामत, स्मशानभूमी कर्मचारी निंबा गढरी, पंकज कांबळे, सचिन वर्तक, सफाई कर्मचारी बाळा चाचड, किरण नाकती, समाजसेविका श्वेता दाभोळकर, पत्रकार रवींद्र खर्डीकर यांना कोव्हीड योद्धे पुरस्काराने सन्मानित केले.