कल्याण : धावत्या एक्स्प्रेसमधून उतरण्याचा प्रयत्न एकाच्या जीवावर बेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याण स्थानकावर फलाट क्रमांक ५ वर गुरुवारी दुपारच्या दरम्यान ही घटना घडली आहे. प्रदीप भंगाळे असे मयत वैक्तीचे नाव असून प्रदीप अनेक वर्षापासून महापालिकेत ठेकेदार म्हणून काम करत होता.
भुसावळपासून कल्याणपर्यंत प्रदीप प्रवास करत होता कल्याण स्टेशनवर गाडी येताच प्रदीपने धावत्या गाडीमधून उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडीचा वेग जास्त असल्याने प्रदीपचा तोल गेला व तो फलाट व गाडीच्या मधल्या पोकळीत अडकला व त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून रेल्वे पोलिसांकडून धावत्या गाडीवरुन उतरू नये असे आव्हान केले जात आहे.