Monday, July 22, 2024
Homeमहत्वाची बातमीशिवसेना नेते यशवंत जाधवांच्या ४१ मालमत्ता जप्त

शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या ४१ मालमत्ता जप्त

आयकर विभागाने उगारला कारावाईचा बडगा

मुंबई : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. आयकर विभागाने यशवंत जाधव यांच्या आणि परिवाराच्या ४१ मालमत्ता जप्त केल्या आहेत.

या मालमत्तांमध्ये त्यांच्या आमदार पत्नी यामिनी जाधव यांच्याशी संबंधित मालमत्तांवरही कारवाई झाली आहे. जप्त केलेल्या ४१ मालमत्तांमध्ये बिल्कवडी चेंबर बिल्डींगमधील ३१ फ्लॅट, भायखळा येथील इंपिरिकल क्राऊन हॉटेल आणि वांद्रे येथील एका फ्लॅटचा समावेश असल्याचे समजते.

यशवंत जाधव यांनी महापालिकेत ज्या कंपन्यांना कंत्राट दिली त्याचीही आयकर विभागाने चौकशी केली. या चौकशीत जाधव परिवाराने प्रधान कंपनीला कर्जाची परतफेड म्हणून दिलेले पैसे हे विविध मार्गांनी फिरवून कंत्राटदार बिमल अग्रवालच्या कंपनीत आल्याचे उघड झाले आहे. यातील पैशांमधून यशवंत जाधव यांनी आपल्या सासुबाई सुनंदा मोहिते यांच्या नावावर भायखळा परिसरात इंपेरिकल क्राऊन नावाचे हॉटेलही खरेदी केल्याचे समोर आले आहे. आयकर विभागाने यशवंत जाधव यांचा मेव्हणा आणि पुतण्या यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र ते अद्याप हजर राहिलेले नाहीत.

यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जाधव यांनी शेल कंपनींच्या माध्यमातून कोट्यावधींची उलाढाल करत रोख पैसा या कंपनींना देण्यात आला आणि या कंपनीच्या माध्यमातून लिगल एन्ट्री स्वत:च्या आणि आपल्या निकटवर्तीयांच्या नावावर घेण्यात आल्या, लोनच्या स्वरुपात परिवारातील इतर सदस्यांना पैसे या शेल कंपनीकडून देण्यात आले. एकूण १५ कोटी रुपये यशवंत जाधव यांनी प्रधान डिलर्स यांच्याकडून वेगवेगळ्या खात्यांमधून कर्ज म्हणून घेतले.

आयकर विभागाच्या अहवालानुसार, उदय शंकर महावर या व्यक्तीकडून 2019-20 मध्ये यशवंत जाधव, यामिनी जाधव आणि इतर सदस्यांना 15 कोटी दिले गेले. ही 15 कोटींची रोख रक्कम यशवंत जाधव यांनी उदय शंकर महावर यांना दिले आणि नंतर उदय शंकर यांच्या कंपनीकडून आपल्या खात्यांमध्ये लीगल एंट्री करुन घेतले. यातील 15 कोटी पैकी 1 कोटी यामिनी जाधव यांनी कर्ज घेतले आणि ते निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -