नवी दिल्ली (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या आगामी भागासाठी लोकांना, त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या संकल्पना आणि समस्यांवरील विचार व्यक्त करण्यासाठी आमंत्रित केले आहे. मायजीओव्ही, नमो अॅपद्वारे लोकांना आपल्या कल्पना पाठवता येतील किंवा संदेश ध्वनीमुद्रित करण्यासाठी १८००-११-७८०० नंबरवर संपर्क करता येईल.
‘मन की बात’ कार्यक्रमाचा ८८ वा भाग २४ एप्रिल २०२२ रोजी प्रसारीत होणार आहे. मायजीओव्हीचे आमंत्रण देताना पंतप्रधानांनी ट्विट केले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, “#MannKiBaat च्या माध्यमातून आम्ही तळागाळातील घटकात बदल घडवणार्यांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करतो.
तुम्हाला अशा प्रेरणादायी जीवन प्रवासाविषयी माहिती आहे का? या महिन्याच्या २४ तारखेच्या कार्यक्रमासाठी ते आम्हाला नक्की पाठवा करा. संदेश ध्वनीमुद्रित करण्यासाठी मायजीओव्ही, नमो अॅपवर लिहा किंवा १८००-११-७८०० वर संपर्क करा.”