Saturday, January 18, 2025
Homeताज्या घडामोडीनवी मुंबई पालिका लोकशाही दिन २ मे रोजी

नवी मुंबई पालिका लोकशाही दिन २ मे रोजी

नवी मुंबई (वार्ताहर) : राज्य शासनाच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. मे महिन्याचा लोकशाही दिन २ मे रोजी होणार असून निवेदनकर्त्यांनी आपला अर्ज विहित नमुन्यात दोन प्रतींमध्ये दि. १५ एप्रिल २०२२ पर्यंत मा. आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांच्या नावे ‘लोकशाही दिनाकरीता अर्ज’ असे अर्जाच्या वरील दर्शनी भागी ठळकपणे नमूद करून सादर करावयाचा आहे. या अर्जात नमूद तक्रार/निवेदन हे वैयक्तिक स्वरूपाचे असावे.

अर्ज एकाच विभागाशी संबंधित एकाच विषयाबाबत असावा. अर्जदाराने संबंधित विषयाबाबत याआधी विभाग कार्यालय, विभागप्रमुख स्तरावर निवेदन सादर केलेले असावे. या शिवाय लोकशाही दिनामध्ये-न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व/अपिल, सेवाविषयक-आस्थापनाविषयक बाबी याबाबतचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घेण्यात यावी. त्याचप्रमाणे विहित नमुन्यात नसणारे व अर्जासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्जही स्विकारले जाणार नाहीत.

तसेच तक्रार / निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे नसेल तर तसेच यापूर्वीच अंतिम उत्तर दिलेले आहे / देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्जही स्विकारले जाणार नाहीत. लोकशाही दिनाकरीता करावयाच्या अर्जाचा विहित नमुना नागरिकांसाठी महानगरपालिका नुतन मुख्यालय इमारत, जनसंपर्क विभाग, तिसरा मजला, से. १५ ए, किल्ले गावठाण जवळ, सी.बी.डी., बेलापूर येथे विनामूल्य उपलब्ध असून नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.nmmc.gov.in यावरील डाऊनलोड आयकॉनवरून अर्ज नमुना प्रत सहजपणे डाऊनलोड करून घेता येऊ शकते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -