मुंबई : हॉटेलचा परवाना हस्तांतरित करण्यासाठी पैशांची मागणी करणारा आरोग्य अधिकारी व त्याच्या खासगी साथीदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. दरम्यान हे हॉटेल २०१८ साली एकाने विकत घेतल होते.
मात्र पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेले लायसन्स जुन्या मालकाच्या नावे होते. यामुळे नवीन मालकाला लायसन्स स्वत:च्या नावावर हस्तांतरित करणे, हॉटेलचे डिझेल इंधन आधारीत भट्टीचे एलपीजीमध्ये रूपांतर करणे, पत्त्यामध्ये पिन कोड दुरुस्त करणे याकरिता अडचणी येत होत्या.
मात्र यासाठी पालिकेच्या बी वॉर्ड येथे संबंधित व्यक्तीने अर्ज केला होता. त्यावर आरोग्य अधिकारी असलेल्या संदिप रवींद्र गायकवाड यांनी या व्यक्तीकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यामधील ४० हजारांची लाच घेताना गायकवाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.