नवी दिल्ली : देशाचा जीडीपी यंदा 7.2 टक्के राहण्याची शक्यता भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) वर्तवली आहे. आरबीआयने आज, शुक्रवारी आपले पतधोरण जाहीर केले. यंदा व्याज दरात कोणताही बदल करण्यात आला नसल्याची माहिती गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत दिली. पतधोरणात रेपो दरामध्ये कोणताही बदल न करता तो 4 टक्के इतका कायम ठेवण्यात आला आहे. तर, रिर्व्हस रेपो रेट 3.75 टक्के इतका करण्यात आला आहे. सलग अकराव्यांदा व्याज दरात कोणताही बदल करण्यात आला नाही.
आरबीआय गर्व्हनर दास यांनी सांगितले की, भू-राजकीय संघर्षाचा परिणाम अनेक अर्थव्यवस्थांवर होत आहे. भारतासाठीदेखील हा आव्हानात्मक काळ आहे. देशात महागाई दर वाढण्याचाही अंदाज असल्याचे त्यांनी सांगितले. यंदा मान्सून सरासरी राहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक बाजारातील घडामोडी पाहून धोरणात बदल करण्यात येईल असेही दास यांनी सांगितले.
शक्तिकांत दास यांनी दिलेल्या माहितीनुसार आरबीआयने रेपो आणि रिव्हर्स रेपो रेट जैसे थे ठेवले आहेत. रेपो रेट 4 टक्के तर रिव्हर्स रेपो रेट 3.5 टक्क्यांवरच, कोणताही बदल नाही सुरु आर्थिक वर्षात जीडीपी 7.2 टक्के राहण्याची शक्यता आहे. 2023 सालसाठीचा अंदाजित जीडीपी 7.8 टक्क्यांवरून 7.2 टक्क्यांवर घसरला आहे. येत्या काही दिवसात महागाईची झळ बसण्याचा अंदाज, महागाई दर 5.7 टक्के राहण्याची शक्यता असून महागाई दर 4.5 टक्क्यांवरुन वाढून 5.7 टक्के राहण्याचा अंदाज आहे.
तसेच एप्रिल-जूनमध्ये किरकोळ महागाई दर 6.3 टक्के राहण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये कच्च्या तेलाच्या किंमती अंदाजे सरासरी 100 डॉलर प्रति बॅरल राहण्याचा अंदाज आहे. कोव्हिड, युक्रेन-रशिया युद्ध आणि या सर्वांमुळे तयार झालेल्या अस्थिरतेमुळे येत्या काळात भारताला महागाईची झळ पोहोचणार, सोबतच भारताच्या विकासचा वेग देखील मंदावण्याची भीती व्यक्त केली जातेय.