Friday, May 9, 2025

महाराष्ट्र

केके, यशवंतपूर रेल्वे गाड्यांतील ९ स्लीपरच्या जागी येणार एसी डबे

केके, यशवंतपूर रेल्वे गाड्यांतील ९ स्लीपरच्या जागी येणार एसी डबे

सोलापूर (हिं.स) : सोलापुरवरून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या बंगळुरू-दिल्ली आणि यशवंतपूर-बिकानेर या सुपर फास्ट एक्स्प्रेस गाड्यांतील स्लीपर कोचेस कमी करून त्या ठिकाणी वातानुकूलित डबे जोडण्यात येणार आहे. या बदलाला रेल्वेच्या दक्षिण विभागाने सुरुवात केली.


दक्षिण रेल्वे विभागातील बंगळुरू - दिल्ली कर्नाटक म्हणजेच के.के. सुपर फास्ट एक्स्प्रेस आणि यशवंतपूर बिकानेर सुपरफास्ट एक्स्प्रेस या दोन गाड्या सोलापूरमार्गे जातात. सोलापूरच्या प्रवाशांना या गाड्यांचा चांगला उपयोग होतो. आता एलएचबी कोच व्यवस्थेनुसार स्लीपर डब्यांची जागा थर्ड, सेकंड आणि फर्स्ट एसी डबे घेतील. सध्याच्या या गाड्यांना २३ डबे आहेत. त्यात वातानुकूलित ९ डब्यांची भर पडणार आहे.


त्यामुळे लांब पल्ल्याच्या या गाड्यांतून वातानुकूलित प्रवास करण्यासाठी अधिक डबे मिळणार आहेत. स्लीपर डबे कमी करून त्या ठिकाणी वातानुकूलित डबे येणार असल्याने कमी खर्चात प्रवास करणाऱ्या मध्यमवर्ग प्रवाशांना याचा फटका बसणार आहे.

Comments
Add Comment