Tuesday, April 29, 2025

महामुंबईराजकीयमहत्वाची बातमी

'विक्रांत'प्रकरणी आम्ही दमडीचाही घोटाळा केला नाही : किरीट सोमय्या

'विक्रांत'प्रकरणी आम्ही दमडीचाही घोटाळा केला नाही : किरीट सोमय्या

मुंबई : राज्यात शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या एक-एक करत शिवसेना नेत्यांचे घोटाळे बाहेर काढत आहेत. आता शिवसेना नेते संजय राऊत सोमय्यांच्या रडारवर आहेत. काल संजय राऊतांनी केलेल्या आरोपाला किरीट सोमय्यांनी जोरदार प्रत्युतर दिले आहे.

सोमय्या म्हणाले, संजय राऊत माझ्याबाबतच्या पुराव्याचा एकही कागद देऊ शकत नाही. तसेच आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत. विक्रांत प्रकरणी आम्ही एक दमडीचाही घोटाळा केला नाही, त्यामुळे कोणाला घाबरण्याचे काही कारण नाही, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.

संजय राऊत यांनी काल किरीट सोमय्यांवर नव्यानं आरोप करत 'आएनएस विक्रांत फाइल्स' उघड केली. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी जमा करण्यात आलेला निधी हा राज्यपालांकडं सुपूर्द करण्यात येणार असल्याचं सोमय्यांनी म्हटलं होतं. आरटीआय कार्यकर्ते विरेंद्र उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून याबाबत ही माहिती मागवली होती. मात्र, राज्यपाल कार्यालयात असा कोणताही निधी मिळाला नसल्याची माहिती राज्यपाल कार्यालयानं दिली असल्याचं राऊतांनी म्हटलं. ही माहिती मागील महिन्यात आली असल्याचं राऊतांनी सांगितलंय. आयएनएस विक्रांत भंगारात काढण्याविरोधात किरीट सोमय्या यांनी आंदोलन केलं होतं. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी त्यांनी लोकांकडून निधी जमवला होता. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी किरीट सोमय्या यांनी निधी गोळा करायला सुरुवात केली होती. या दरम्यान 57 ते 58 कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात होता. सोमय्या यांच्यासह इतर भाजप नेतेदेखील सहभागी होते. मात्र, या भ्रष्टाचाराच्या कटाचे प्रमुख सोमय्या होते, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

Comments
Add Comment