Wednesday, July 17, 2024
Homeक्रीडाश्रीलंकेतील आर्थिक संकटाचा आयपीएललाही फटका

श्रीलंकेतील आर्थिक संकटाचा आयपीएललाही फटका

कोलंबो (वृत्तसंस्था) : सध्या श्रीलंकेसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. या आर्थिक संकटाचा फटका श्रीलंकेमधील सर्वच क्षेत्रांना बसला असून प्रसारमाध्यम समुहांमधूनही अनेकांना कामावरून काढून टाकण्यात येत आहे. अनेक टीव्ही चॅनेल्स आणि वृत्तपत्रांनी कर्मचारी कपात केल्याने लोकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. याच कारणामुळे आयपीएलचे प्रसारण थांबले आहे.

श्रीलंकेमधील दोन महत्त्वाच्या वृत्तपत्रांमधील आयपीएलचं वृत्तांकन पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. या वृत्तपत्रांमध्ये आता वेळ आर्थिक संकटासंदर्भातील वृत्तांकन केले जात आहे. याचप्रमाणे अनेक स्पोर्ट्स चॅनेल्सनी कर्मचारी कपात केल्याने आयपीएलचे थेट प्रक्षेपणही (लाइव्ह टेलिकास्ट) बंद करण्यात आलं आहे. अनेक ठिकाणी आवश्यक कर्मचारी संख्याच नसल्याने आयपीएलच्या प्रसारणावर परिणाम झाला आहे.

देशातील अनेक क्रिकेटप्रेमींना आयपीएलचं थेट प्रक्षेपण हवं आहे. स्थानिक चॅनेल्सलाही आयपीएलच्या सामन्यांचं प्रक्षेपण हवं आहे. मात्र सध्या देशात असणारं आर्थिक संकट एवढं मोठं आहे की, आयपीएलचं थेट प्रक्षेपण थांबवावं लागलंय. काही आठड्यांपूर्वी सरकारने शाळांमधील परीक्षाही पेपरचा तुटवडा असल्याने रद्द करण्यात आल्यात, असं स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटलं आहे.

सामन्यांचं प्रक्षेपण रद्द झाल्याने याचा परिणाम जाहिरातींवर आणि पर्यायाने चॅनेल तसेच आयपीएलच्या माध्यमातून होणाऱ्या कमाईवर होणार आहे. श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू माहेला जयवर्धने सध्या मुंबई इंडियन्सच्या संघासोबत प्रशिक्षक म्हणून काम करतोय. देशातील परिस्थिती पाहून वाईट वाटत असल्याचं त्याने म्हटलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -