Monday, July 15, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेअतिरिक्त आयुक्तांनी घेतली स्वच्छता निरीक्षकांची झाडाझडती

अतिरिक्त आयुक्तांनी घेतली स्वच्छता निरीक्षकांची झाडाझडती

ठाणे (हिं.स) : शहरातील स्वच्छता, साफसफाई कामाला प्राधान्य देवून पावसाळ्यापूर्वी स्वच्छता, सार्वजनिक शौचालय साफसफाई, रस्त्याची साफसफाई, फुटपाथ स्वच्छता तसेच रस्त्यावरील डेब्रिज तात्काळ उचलण्याच्या कडक सूचना महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी सर्व स्वच्छता निरीक्षकांना दिल्या. महापालिकेच्या कैं.अरविंद पेंडसे सभागृहात त्यांनी सर्व उप मुख्य स्वच्छता निरीक्षक, निरीक्षक यांच्या समवेत तातडीने बैठक घेवून संपूर्ण स्वच्छता, साफसफाई कामाचा आढावा घेतला.

शहरातील सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती नळ व्यवस्था, साफसफाई, रस्त्यावरील साफसफाई, तलाव साफसफाई, सार्वजनिक शौचालयांना नळ संयोजने, डेब्रिज उचलणे तसेच परिसर स्वच्छता तसेच परिसर सुशोभीकरण आदी गोष्टी अद्ययावत ठेवण्याबाबत कडक शब्दात सूचना अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी सर्व स्वच्छता निरीक्षकांना दिल्या.

दरम्यान शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरू असलेल्या “स्वच्छ सर्वेक्षण २०२२” मोहिमेंतर्गत करण्यात येणाऱ्या विविध कामाबाबतही सतर्क राहण्याच्या कडक सूचनाही त्यांनी सर्व स्वच्छता निरीक्षकांना दिल्या. यासोबतच शहरात बेकायदेशीररित्या प्लास्टीक, थर्माकोल सारख्या अविघटनशील वस्तुंची विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी संबंधितांना दिले.

शहरातील गृहसंकुलाशी समन्वय साधून ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच प्रत्येक प्रभाग समितीनिहाय उप मुख्य स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक केलेल्या दैनंदिन कामकाजाचा अहवाल दर आठवड्याला सादर करण्याचा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -