लासलगाव (वार्ताहर) : दि लासलगाव मर्चन्ट्स को-ऑफ बँकेस सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात २ कोटी ३९ लाखांचा ढोबळ नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अशोकराव गवळी, उपाध्यक्ष राजेंद्र घोलप व ज्येष्ठ संचालक सीए अजय ब्रह्मेचा यांनी दिली. बँकेने बँकेच्या स्थैर्य वृद्धीच्या दृष्टीने भरघोष तरतुदी केलेल्या असून निव्वळ नफा रु. १ कोटी ६२ लाख इतका झालेला आहे.
या वर्षअखेरीस बँकेचे स्वनिधी १२ कोटी ४४ लाख असून ठेवी रु. १४७ कोटी ६२ लाख आहेत कर्जवाटप ५७ कोटी २७ लाख केलेले असून सुरक्षित गुंतवणूक रु. ७९ कोटी १७ लाख केलेली आहे. बँकेचे नाशिक जिल्हा कार्यक्षेत्र असून विशेषत: ग्रामिण भागात कार्यरत असल्याने ग्राहक शेती क्षेत्राशी निघडीत आहेत. त्यामुळे नैसगिक आपत्ती व कोरोणाचा प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर बँकेस कर्जवसूलीस अतिशय प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला. तथापि सौजन्य व सहकार्याच्या वसूलीच्या माध्यमातुन समाधानकारक वसूली करून एनपीओ ६.२६% इतके राखण्यात यश आलेले आहे.
कर्मचाऱ्यांच्या अथक मेहनतीतून हे सहज साध्य झाले, असे बँकेचे अध्यक्ष यांनी सांगितले. बँकेच्या संचालक मंडळाने सामाजिक बांधिलकीतून शहराच्या विकासासाठी काही भरीव कार्य करणेचा मानस आहे. या प्रसंगी बँकेचे संचालक अजय ब्रह्मेचा, संतोष पलोड, संजय कासट, डी. के. जगताप, सचिन शिंदे, सचिन मालपाणी, ओमप्रकाश राका, हर्षद पानगव्हाणे, पारसमल ब्रह्मेचा, प्रवीण कदम, सोमनाथ शिरसाठ, किसनराव दराडे, संगीताताई पाटील, अर्चना पानगव्हाणे व मुख्य कार्यकारी अधिकारी मनोहर जाधव आदी उपस्थित होते.