Friday, May 9, 2025

महामुंबई

मुंबईकर शंभर टक्के लसवंत

मुंबईकर शंभर टक्के लसवंत

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईला शंभर टक्के लसवंत करण्याचे उद्दिष्टे मुंबईत महापालिकेने पूर्ण केले आहे. त्यामुळे मुंबईत लसीकरण पूर्ण करण्याला पालिकेला यश आले आहे. मुंबईतील दोन्ही मात्रा घेतलेल्या १८ वर्षांवरील नागरिकांची संख्या आता १०० टक्के झाली आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ९२ लाख ४२ हजार ८८८ नागरिकांनी लशीच्या दोन्ही मात्रा पूर्ण केल्या आहेत.


दरम्यान, मुंबई महापालिकेने पहिल्या लसमात्रेचे तब्बल १११ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले असून दुसरी लस घेणाऱ्या नागरिकांचे उद्दीष्ट गाठता येत नव्हते. २६ जानेवारीपर्यंत १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालिका प्रशासनाने ठेवलेले असतानाही पालिकेला हे तेव्हा गाठता आले नव्हते.


दरम्यान एप्रिल महिन्यात हे उद्दिष्ट गाठले असून आतापर्यंत १ कोटी २ लाख ९६ हजारांहून अधिक नागरिकांनी म्हणजेच १११ टक्के नागरिकांनी पहिली मात्रा घेतली आहे, तर ९२ लाख ४२ हजार ८८८ नागरिकांनी दोन्ही मात्रा घेतल्या आहेत.



५१ नव्या रुग्णांची नोंद


बुधवारी दिवसभरात मुंबईत ५१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर २४ तासांत ३८ जण बरे झाले आहेत. बरे झालेले एकूण रुग्णांची संख्या १०,३८,३९४ इतकी झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८ टक्के आहे. दरम्यान मुंबईत एकूण सक्रिय रुग्ण २८३ इतकी आहेत. रुग्ण दुप्पटीचा दर १८,२८४ दिवस झाला आहे. मुंबईत लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याने रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे.


दरम्यान राज्य सरकारने कोरोना निर्बंध शिथील केले आहेत. तसेच सध्या १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण केले जात आहे. त्यालाही वेग आला आहे. त्यामुळे सध्या मुंबईत कोरोना नियंत्रणात आहे. मास्कसक्तीही शिथील करण्यात आली आहे.

Comments
Add Comment