Friday, December 13, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेमानपाडा रोडवरील खोदलेल्या रस्त्याची डागडुजी करून देण्याची मागणी

मानपाडा रोडवरील खोदलेल्या रस्त्याची डागडुजी करून देण्याची मागणी

डोंबिवली (हिं.स.) : कल्याण-डोंबिवली महापालिका परिक्षेत्रात होणारी पाणीटंचाई समस्या सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाकडून अमृतयोजने अंतर्गत विकासकामे हाती घेण्यात आली. दरम्यान अमृतयोजनेतून पाण्याची पाईपलाईन टाकताना केलेल्या रस्त्याच्या खोदकामामुळे मानपाडा रोड येथे मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असून वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे सबब रस्त्याची डागडुजी करून करदात्या नागरिकांना वेठीस धरू नये अशी मागणी भाजपाचे कल्याण-डोंबिवली शहर जिल्हा उपसचिव सचिन म्हात्रे यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.

कल्याण डोंबिवली महानगत पालिकेत ती २७ गावे समाविष्ट असली तरी अद्याप पायाभूत तसेच मूलभूत सुविधांची समस्या ग्रामीण विभागातील नागरिकांना सतावत आहे. पाण्यासाठी महिलावर्गाला भटकंती करावी लागत असून पाण्याची समस्या सोडवण्यासाठी अमृत योजना आणून त्यातून सोडवणूक होईल अशी आशा होती. पण तेही अद्याप अधांतरीच आहे. विजेचा लपंडाव सुरूच असून फक्त बिले भरण्यासाठीच वीज आहे का असा समज वीजग्राहकांचा होत आहे. रस्त्याचं दारिद्र कधी संपणार याबत ज्योतिष्याल भविष्य विचारून तो ही हात वर करील अशी परिस्थिती परिक्षेत्रात आहे.

रस्ते खोदून जो पराक्रम प्रशासनाने केला आहे त्याचा बंदोबस्त केला तरीही नागरिक सुखावततील अशी कडवट टीका म्हात्रे यांनी केल्याची चर्चा ग्रामीण भागात होत आहे. प्रशासनाने या मानपाडा रस्त्याकडे लक्ष द्यावे असे पत्र पालिका प्रशासनाला दिले असून रस्ता कधी दुरुस्त होणार याकडे लक्ष आहे. मानपाडा रोड, शंकेश्वरनगर ते संघवी गार्डन, एकता नगर, गणेश नगर, चर्च परिसर ते अष्टधातू शिवमंदिर, मानपाडा रोड ते समर्थ कृपा इमारत येथे अमृत योजनेतून पाण्याची पाईपलाईन टाकताना रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे.

शंकेश्वर नगर ते संघवी गार्डन हा मानपाडा रोडचा मुख्य रस्ता असल्या कारणाने या ठिकाणी वाहतूककोंडी निर्माण होते. तसेच, दुचाकी वाहनांचे अपघातही होतात अशी माहिती पत्राद्वारे म्हात्रे यांनी प्रशासनाला दिल्याचे सांगितले. जर याकडे आता दुर्लक्ष करण्यात आले तर भाजपा आपल्या पद्धतीने आंदोलन करील मात्र याबाबच्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी प्रशासनाची असेल असेही सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -