मुंबई : मध्यमवर्गीय माणसाची व्याख्या काय आहे? मध्यमवर्गीय माणूस आणि मध्यमवर्गीय राजकारणी सारखेच असतात? असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी संजय राऊतांना केला आहे.
संजय राऊतांची मालमत्ता ईडीने जप्त केल्यानंतर राऊतांनी ईडी अधिकाऱ्यांवर आरोप केले. ईडीने त्यांची देणीदारांची चौकशी करायला हवी. पण, राज्यात आमच्यासारख्या मराठी मध्यमवर्गीय माणसांवर कारवाई केली जाते, असे राऊत म्हणाले होते. त्यावरून अमृता फडणवीस यांनी थेट संजय राऊतांना टोला लगावला आहे.
https://twitter.com/fadnavis_amruta/status/1511947488257019908अमृता फडणवीस राज्यातील राजकीय परिस्थितीवर अनेकदा टीका करत असतात. कधी मुंबईच्या रस्त्यावरून शिवसेनेला टोला लगावतात, तर कधी वसुली सरकार म्हणून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधतात. आता त्यांनी भाजपचे लोक भिकारी आहेत का? यांच्याकडे काहीच नाही का? ईडीने त्यांच्यावर कारवाई करायला हवी. पण, मराठी मध्यवर्गीय माणसांवर कारवाई करून ईडी सूड उगवत आहे, असे गंभीर आरोप करणा-या राऊतांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.