मुंबई : शेअर बाजारात बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. यामुळे बाजारात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तेजीला ब्रेक लागला.
विकली एक्सपायरीच्या आदल्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स ५६६.०९ अर्थात ०.९४ टक्क्यांनी घसरून ५९६१०.४१ वर बंद झाला, तर निफ्टीमध्येही १४९.७५ अर्थात ०.८३ टक्क्यांची घसरण होऊन १७,८०७.६५ बंद झाला.
तत्पूर्वी बुधवारी विकली एक्सपायरीच्या आदल्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली. शेअर बाजाराच्या दोन्ही निर्देशांकात आजच्या दिवसाच्या सुरुवातीला घसरण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दिलं. सेन्सेक्स ३६०.७९ अंकांच्या घसरणीसह ५९८१५.७१ वर सुरू झाला. तर निफ्टीही ११५ अंकांच्या घसरणीसह १७८४२.७५ वर सुरू झाला.