
पुणे (हिं.स): नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडील मोठ्या प्रमाणात असलेल्या रिक्त पदांमुळे लिपिक, वरिष्ठ लिपिकांकडे दुय्यम निबंधक या पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. संबंधितांना हाताशी धरून बांधकाम व्यावसायिकांनी तब्बल दहा हजार 561 मालमत्ता खरेदी-विक्रीचे बेकायदा दस्त नोंदविल्याचे उघड झाले आहे. त्यामध्ये सर्वाधिक बेकायदा दस्त वाघोली आणि हडपसरमध्ये नोंदवल्याचे समोर आले आहे.
चहुबाजूने वाढणा-या आणि मेट्रो, दोन वर्तुळाकार रस्ते, नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे पुणे शहरासह जिल्ह्यात रेरा आणि तुकडेबंदी कायद्यांचे उल्लंघन करून मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांचे बेकायदा दस्त नोंद झाल्याचे तपासणीतून समोर आले आहे.
राज्य शासनाने नियुक्त केलेल्या समितीने तपासणीत शहरातील सर्व 27 दुय्यम निबंधक कार्यालयांमधील संशयित दस्तांची तपासणी केली. त्यामध्ये रेराकडे नोंद न करता नोंदविलेले दस्त 70 टक्के असून, तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून 30 टक्के दस्त नोंदवले आहेत.