मुंबई (प्रतिनिधी) : भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी शिवसेनेसह पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली असून पालिकेतील कामे आपल्या मर्जीतील ठेकेदारांना देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर आपल्या मर्जीतील ठेकेदार व कंपन्याना कंत्राट मिळाले पाहिजे याची संपूर्ण सोय प्रशासनाला दबावात आणून केली जाते. तो प्रस्तावच या पद्धतीने तयार केला जातो. इतर कंपन्या त्यात सहभागी होतील पण पात्र ठरणार नाहीत,” असा आरोप देखील कोटेचा यांनी केला आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी तसाच डाव आता परत १४०० ईलेक्ट्रीक बसेस खरेदी कंत्राटमध्ये अवलंबला आहे असेही कोटेचा म्हणाले.
कोटेचा म्हणाले की, एकीकडे केंद्र सरकारचे २३४ कोटी खात्यात जमा झाल्यानंतर सुद्धा नेहमीप्रमाणे केंद्र सरकार पैसा देत नाही म्हणून ओरड करायची आणि दुसरीकडे टक्केवारीसाठी लगबगीने सोयीस्कर निविदा काढायच्या. पण लक्षात ठेवा, भाजप असे होऊ देणार नाही. मुंबईकरांना मोकळा श्वास घेता यावा म्हणून मिळालेल्या केंद्र सरकारच्या निधीवरील टक्केवारीवर डल्ला मारू देणार नाही. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी सिव्हीसी आणि कॅग यांच्याकडे आम्ही तक्रार दाखल करणार आहोत,”असे कोटेचा म्हणाले.