Friday, May 9, 2025

महामुंबई

३ लाखांची लाच घेतल्याप्रकरणी पालिकेच्या अधिकाऱ्याला अटक

३ लाखांची लाच घेतल्याप्रकरणी पालिकेच्या अधिकाऱ्याला अटक

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या के पूर्व कार्यालयातील अधिकारी आणि सहकाऱ्याला तीन लाख रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या के पूर्व कार्यालयात असलेल्या भाडे संकलक व त्यांच्या सहकाऱ्याने एका व्यक्तीची दुकाने पालिकेकडे एनेक्चर -२ नोंद करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणी लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे.


मुंबई महापालिकेच्या के पूर्व कार्यालयातील अधिकारी राजेंद्र नाईक यांनी तक्रारदार यांना त्यांच्या पत्नीच्या घरासंदर्भातील अपीलाबाबत ऑर्डर बदलून देण्यासाठी व तक्रारदार यांच्या नावे असलेल्या दुकानाची नोंद कमर्शियल म्हणून पूर्ववत करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे तीन लाख रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वरळी मुंबई येथे १८ फेब्रुवारी, २०२२ रोजी लेखी तक्रार दिली.


२१ फेब्रुवारी, २०२२ रोजी केलेल्या पडताळणीत राजेंद्र नाईक यांनी तक्रारदार यांना पत्नीच्या घरासंदर्भातील ऑर्डर बदलून देण्यासाठी व तक्रारदार यांच्या नावे असलेल्या दुकानाची नोंद पूर्ववत करण्यासाठी तक्रारदाराकडे तीन लाख रुपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याने ४ एप्रिल, २०२२ रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान नाईक व त्यांचे सहकारी मोहन रावजी या दोघांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे.

Comments
Add Comment