मुंबई (प्रतिनिधी) : महेंद्र सिंह धोनी अजून सीएसकेचा कर्णधार आहे. मी जेव्हा जडेजाकडे पाहतो तेव्हा तो फक्त सीमा रेषेजवळ असतो. अशा परिस्थितीत त्याच्याकडे गोष्टी नियंत्रणात ठेवण्याची संधी असणार नाही. जडेजाने त्याची सर्व डोकेदुखी धोनीला दिली आहे. जो विकेटच्या मागून फिल्डिंग सेट करतोय, असे मत भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने व्यक्त केले.
हरभजन म्हणाला, जडेजा स्वत:वरील सर्व भार धोनीकडे देत आहे. रवींद्र जडेजाकडे आत्मविश्वास आहे. जेव्हा फलंदाजी आणि गोलंदाजीचा विषय येतो तेव्हा त्याचा हात कोणी धरू शकत नाही. आता त्याला नेतृत्व गुणाबाबत स्वत:ला पुढे घेऊन जावे लागले. धोनीने आयपीएलच्या १५व्या हंगामाच्या आधी कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता आणि जडेजाला उत्तराधिकारी नियुक्त केले होते.
कर्णधार म्हणून जडेजा अद्याप पहिल्या विजयाची वाट पाहत आहे. चेन्नईने आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत आणि त्यात त्यांचा पराभव झालाय. कोलकाता, गुजरात आणि पंजाब संघाकडून त्यांचा पराभव झाला आहे. आयपीएल २०२२ मध्ये चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात फार चांगली झाली नाही.