मुंबई (प्रतिनिधी) : युद्धनौका आयएनएस विक्रांत डिकमिशन केल्यानंतर, ती भंगारात जाणार होती. ती भंगारात जाऊ नये म्हणून भाजप नेते किरीट सोमय्या आणि सहकाऱ्यांनी ५८ कोटी रुपयांचा निधी गोळा केला होता. २०० कोटी रुपये राजभवनात पैसे गोळा करू असे सांगितले गेले; परंतु असे कोणतेही पैसे राजभवनात जमा झाले नसल्याचे माहिती अधिकारातून समोर आले असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर केला आहे.
किरीट सोमय्या यांनी ‘सेव्ह विक्रांत चळवळ’ केली. त्यातून पैसे गोळा केले. २०० कोटी रुपये राज भवनात जमा करू असे सोमय्या यांनी सांगितले होते. २०१३-१५ मध्ये विक्रांत नौकेसाठी पैसे जमा केले आहेत का, असे माहिती अधिकारात विचारले गेले होते. त्यावर राज्यपालांचे उत्तर आहे की, असे कोणतेही पैसे जमा केले नाहीत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
सोमय्यांनी देशद्रोह केलाय. १०० कोटींवर घोटाळा केला. राज्यपाल भाजपचे कार्यकर्ते आहेत. ते कसे कारवाई करणार? सीबीआय ईडीला हा गुन्हा मोठा वाटत नाही का? असा सवालही राऊत यांनी विचारला.