इम्रान खान यांना धमकीचे पत्र मिळालेच नाही

इस्लामाबाद (वृत्तसंस्था) : इम्रान खान यांना धमकीचे कोणतेही पत्र मिळाले नसल्याचे पीएमएल-एनच्या उपाध्यक्ष मरियम नवाज यांनी दावा केला आहे.


पाकिस्तानचे इम्रान खान यांची तिसरी पत्नी बुशरा बीबी यांची जवळची मैत्रीण फराह खान देश सोडून परदेशात पळून गेली असून जर पाकिस्तानात नवं सरकार स्थापन झाले, तर तिला अटक होऊ शकते, अशा बातम्याही येत आहेत. मोठी गोष्ट म्हणजे, फराह खान पाकिस्तानातून जवळपास ९० हजार डॉलर घेऊन पळून गेली आहे. त्यातच आता इम्रान खान यांच्या धमकीच्या पत्राबाबत पीएमएल-एनच्या उपाध्यक्ष मरियम नवाज यांनी हा दावा केला.


पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी ज्या पत्राच्या मदतीने परदेशी षडयंत्राचा आरोप केला होता, ते पत्र परराष्ट्र मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांनी तयार केले होते. म्हणजेच, इम्रान खान यांनी स्वतःच त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून पत्र लिहून घेतले, जेणेकरून 'षडयंत्र' सांगून जनतेची दिशाभूल केली जाऊ शकेल, असे मरियम नवाज यांनी म्हटले अाहे. वेबसाइटमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान इम्रान खान कथित धमकीचं पत्र का दाखवत नाहीत? असा सवाल नवाज यांनी केला आहे.


दरम्यान इम्रान खान यांना धमकीचे कोणतेही पत्र मिळाले नसल्याचे मरियम नवाज यांनी सांगितले आहे. इम्रान खान यांनी स्वत: एक पत्र तयार करून घेतलं आणि परकीय कारस्थानाचा आरोप करून देशातील जनतेची दिशाभूल केली असल्याचा दावा मरियम नवाज यांनी केला आहे.


इम्रान खान यांच्याकडून सांगण्यात आले होते की, अमेरिकेत तैनात पाकिस्तानी राजदूताला हे धमकीचे पत्र मिळाले होते, मग त्यांना ब्रसेल्सला का पाठवले? राजदूताला सर्वोच्च न्यायालयात हजर करावे, अशी आपली मागणी असल्याचेही मरियम नवाज यांनी लाहोरमधील पत्रकार परिषदेत सांगितले.

Comments
Add Comment

अफगाणिस्तानने पाकिस्तानमध्ये अचूक फेकला 'टोमॅटो बॉम्ब'

पाकिस्तानमध्ये टोमॅटाचा भाव गगनाला भिडला, एक किलोसाठी मोजावे लागत आहेत ७०० रुपये! कराची : भारतात झालेल्या

ट्रम्प यांचा ८८ लाख रुपयांचा एच-१बी 'व्हिसा बॉम्ब' आजपासून लागू, जाणून घ्या कोणाला सूट मिळणार

वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, H-1B

पाकिस्तानमध्ये ४.७ तीव्रतेचा भूकंप; अनेक घरांचे नुकसान

इस्लामाबाद: सोमवारी पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार,

फिलीपिन्समध्ये फेंगशेन वादळ, १४,००० लोक बेघर; ७ जणांचा मृत्यू

मनिला : उत्तर आणि मध्य फिलिपिन्समध्ये आलेल्या उष्णकटिबंधीय वादळ ‘फेंगशेन’मुळे किमान ७ लोकांचा मृत्यू झाला आहे.

भीषण अपघातात विमान धावपट्टीवरून थेट समुद्रात कोसळलं

मुंबई : अहमदाबाद विमान अपघातानंतर अलीकडे सतत विमान अपघातांची संख्या वाढलेली दिसते. हवाई प्रवास हा सुखकर,

पॅरिसमधील प्रसिद्ध लूव्र संग्रहालयात चोरी, घटनेनंतर संग्रहालय बंद

लंडन : पॅरिसमधील प्रसिद्ध लूव्र म्युझियममध्ये चोरीची घटना घडल्याने म्युझियम एक दिवसासाठी अचानक बंद करण्यात आले