Sunday, January 19, 2025
Homeमहत्वाची बातमीइम्रान खान यांना धमकीचे पत्र मिळालेच नाही

इम्रान खान यांना धमकीचे पत्र मिळालेच नाही

मरियम नवाज यांचा दावा

इस्लामाबाद (वृत्तसंस्था) : इम्रान खान यांना धमकीचे कोणतेही पत्र मिळाले नसल्याचे पीएमएल-एनच्या उपाध्यक्ष मरियम नवाज यांनी दावा केला आहे.

पाकिस्तानचे इम्रान खान यांची तिसरी पत्नी बुशरा बीबी यांची जवळची मैत्रीण फराह खान देश सोडून परदेशात पळून गेली असून जर पाकिस्तानात नवं सरकार स्थापन झाले, तर तिला अटक होऊ शकते, अशा बातम्याही येत आहेत. मोठी गोष्ट म्हणजे, फराह खान पाकिस्तानातून जवळपास ९० हजार डॉलर घेऊन पळून गेली आहे. त्यातच आता इम्रान खान यांच्या धमकीच्या पत्राबाबत पीएमएल-एनच्या उपाध्यक्ष मरियम नवाज यांनी हा दावा केला.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी ज्या पत्राच्या मदतीने परदेशी षडयंत्राचा आरोप केला होता, ते पत्र परराष्ट्र मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांनी तयार केले होते. म्हणजेच, इम्रान खान यांनी स्वतःच त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून पत्र लिहून घेतले, जेणेकरून ‘षडयंत्र’ सांगून जनतेची दिशाभूल केली जाऊ शकेल, असे मरियम नवाज यांनी म्हटले अाहे. वेबसाइटमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान इम्रान खान कथित धमकीचं पत्र का दाखवत नाहीत? असा सवाल नवाज यांनी केला आहे.

दरम्यान इम्रान खान यांना धमकीचे कोणतेही पत्र मिळाले नसल्याचे मरियम नवाज यांनी सांगितले आहे. इम्रान खान यांनी स्वत: एक पत्र तयार करून घेतलं आणि परकीय कारस्थानाचा आरोप करून देशातील जनतेची दिशाभूल केली असल्याचा दावा मरियम नवाज यांनी केला आहे.

इम्रान खान यांच्याकडून सांगण्यात आले होते की, अमेरिकेत तैनात पाकिस्तानी राजदूताला हे धमकीचे पत्र मिळाले होते, मग त्यांना ब्रसेल्सला का पाठवले? राजदूताला सर्वोच्च न्यायालयात हजर करावे, अशी आपली मागणी असल्याचेही मरियम नवाज यांनी लाहोरमधील पत्रकार परिषदेत सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -