Sunday, May 18, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

बेस्ट देयकाचा भरणा आता मोबाइल व्हॅनवर

बेस्ट देयकाचा भरणा आता मोबाइल व्हॅनवर

मुंबई (प्रतिनिधी) : बेस्ट उपक्रमाकडून वीज देयकांचा भरणा करण्यासाठी आता 'मोबाइल व्हॅन' उपलब्ध केली जाणार आहे. या मोबाइल व्हॅनवर ग्राहक बेस्ट वीज बिलासह पाणी, मालमत्ता कर भरणे, फास्ट टॅग रिचार्जची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. कुलाबा बेस्ट भवन येथे गुरुवारी या 'मोबाईल व्हॅन' सुविधेचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.


मुंबईकरांच्या सेवेत बेस्ट देयकाचा भरणा सुलभतेने करण्यासाठी 'मोबाइल व्हॅन' उपलब्ध करण्यात येणार आहे. या मोबाइल व्हॅनवर बेस्ट वीज बिलासह पाणी, मालमत्ता कर भरणे, फास्ट टॅग रिचार्जची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.


वीज ग्राहकांना त्यांच्या वीजदेयकाचे प्रदान सुलभ रीतीने करण्याच्या दृष्टीने भारताच्या राष्ट्रीय देयक महामंडळाद्वारे डिजीटल इंडिया इनिशिएटिव्ह अंतर्गत एक्सपे या संस्थेद्वारा संचालित बीबीपीएस प्रणालीचा वापर करुन मोबाईल देयक भरणा केंद्र सुरु करण्यात येणार आहे. ज्याद्वारे वीजदेयकांव्यतिरिक्त पाणी, मालमत्ता कर देयके भरणे आणि इतर महापालिका सेवा कर, गॅस, डीटीएच क्रेडिट कार्ड, शैक्षणिक शुल्क, फास्ट टॅग रिचार्ज, सदस्यता शुल्क दूरध्वनी आणि भ्रमणध्वनी यांच्या देयकांचे प्रदान केबल तसेच ब्रॉडबँड सेवांचे प्रदान, बेस्टच्या किऑस्क आणि इतर देयकांचे प्रदान करण्याकरिता मोबाईल देयक भरणा केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.

Comments
Add Comment