Friday, May 9, 2025

महाराष्ट्र

उधारीचे २० हजार मागितले म्हणून तरुणाला संपवले

पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. त्यातच आता आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. उधारीचे पैसे परत मागितल्याच्या रागातून एका तरुणाचा कुऱ्हाडीनं डोक्‍यावर वार करुन खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना फुरसुंगी इथं घडली आहे.


या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून युवराज बाबुराव जाधव असं मृत तरुणाचं नाव आहे. तर, गणेश सुरेश खरात याला अटक करण्यात आलीय. गणेश हा सराईत गुन्हेगार असल्याचं कळतंय.


युवराजचे वडील बाबुराव जाधव यांची दुधाची डेअरी आहे. त्यांचा मुलगा त्यांना व्यवसायात मदत करत होता. गणेशनं युवराजकडून 20 हजार रुपये हात उसणे घेतले होते. दरम्यान, युवराज हा गणेशकडं सातत्यानं दिलेलं पैसे मागत होता. रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गणेश हा युवराजच्या घराबाहेर आला आणि युवराजनं पुन्हा एकदा गणेशकडं पैशासाठी तगादा लावला. याचा राग आल्यानं गणेशनं जवळील कुऱ्हाडीनं युवराजच्या डोक्‍यावर सपासप वार केले आणि त्याचा खून केला.

Comments
Add Comment