Thursday, June 19, 2025

राज ठाकरे आजोबा झाले; अमित-मिताली ठाकरेंना पुत्ररत्न

राज ठाकरे आजोबा झाले; अमित-मिताली ठाकरेंना पुत्ररत्न

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आजोबा झाले आहेत. अमित आणि मिताली ठाकरेंना पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. सध्या बाळ आणि आई दोघेही सुखरुप असल्याचे समजते.


गुढी पाडव्याला केलेल्या भाषणानंतर राज ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आले होते. एका बाजूला मनसैनिक मशिदीबाहेर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावण्याचा उपक्रम जोरदारपणे राबवत आहेत. एकंदरीत मनसैनिकांमध्ये गुढी पाडव्यानंतर उत्साहाचं वातावरण होतं. त्यानंतर आता दुसऱ्या बाजूला ठाकरे कुटुंबियांमध्येही आनंदाचं वातावरण दिसून येत आहे. राज ठाकरे आजोबा झाल्यामुळे आता मनसैनिकही आनंदी झाल्याचं वातावरण आहे.

Comments
Add Comment