Saturday, July 20, 2024
Homeमहत्वाची बातमीराज ठाकरेंकडून आघाडी सरकारचा पंचनामा

राज ठाकरेंकडून आघाडी सरकारचा पंचनामा

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची प्रतिक्रिया

मुंबई (प्रतिनिधी) : गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील आघाडी सरकारचा पंचनामा केला. महाराष्ट्रातील वास्तववादी चित्र त्यांनी सांगितले, हे काहीजणांना झोंबले आणि त्यांनी प्रतिक्रिया दिल्या, असे मत केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री यांनी व्यक्त केले. याचे ट्वीट नारायण राणे यांनी केले आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे पुढे म्हणाले की, ज्यांनी आयुष्यभर स्वार्थी, सोयीने सत्ता मिळवली त्यांनी राज ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया द्यावी, हेही एक आश्चर्य आहे. २०१९च्या निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपशी गद्दारी केली त्याहीपेक्षा मोठी गद्दारी हिंदुत्वाशी आहे. पदासाठी, पैशासाठी गद्दारी करणाऱ्यांनी राज ठाकरेंना कितीही उत्तर दिले असले, तरी ‘गद्दारी ती गद्दारीच’. हे निष्ठेचे राजकारण नाही, हे पद आणि सत्तेसाठीचे राजकारण आहे.

‘राज ठाकरेंच्या भाषणामुळे बाळासाहेबांची आठवण’

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे गुढीपाडव्याचे भाषण हे सामान्य हिंदूंच्या मनाला सुखावणारे होते. त्यांच्या भाषणामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आली, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. सामान्य हिंदूंना अभिमान वाटावा, असे राज ठाकरे यांचे भाषण होते. प्रत्येकाला हिंदू आहोत याचा गर्व वाटला पाहिजे. ‘हिंदू’ या शब्दात सर्वधर्म समभाव आहे, असे ते म्हणाले.

‘भाजपचा लाऊडस्पीकर’

शनिवारी शिवाजी पार्कात भाजपचा लाऊडस्पीकर वाजत होता. त्यांचीच स्क्रिप्ट होती. टाळ्या घोषणाही त्यांच्याच होत्या. कालचा भोंगाही भाजपचाच होता. शरद पवारांनी जातीयवाद पसरवला. पण त्याच शरद पवारांच्या चरणाशी तुम्ही जात होतात, सल्ला घेत होतात अशी खोचक टीका शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केली.

‘राज ठाकरे काही चुकीचे बोलले नाही’

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला. भाजपने सेनेशी युती केली. त्यामुळे सेनेच्याही चांगल्या जागा आल्या. दोघांना जनतेने बहुमत दिले. पण, त्या बहुमताचा अनादर करून शिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून तीन पक्षाची सत्ता कपटाने मिळवली. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून तेच सांगितले आहे. त्यांनी भाजपबद्दल जे सांगितलं ते सत्यच आहे. ते काही चुकीचे बोलले नाही, असे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीस नांदेड दौऱ्यावर आहेत. त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -