मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. विशेष पीएमएलए कोर्टाने नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत १८ एप्रिल पर्यंत वाढ केली आहे.
याचबरोबर, न्यायालयाच्या आदेशानुसार नवाब मलिक यांना बिछाना आणि खुर्ची उपलब्ध करून दिली जाणार आहे. शिवाय त्यांना घरचं जेवण आणि औषधी घेण्यासही न्यायालयाकडून परवानगी दिली आहे.
ईडीने मलिक यांना २३ फेब्रुवारीला मनी लॉन्डरिंग प्रकरणात अटक केली होती.