नाईकांचा वाडा होणार शापमुक्त

  60

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘रात्रीस खेळ चाले’ची तिन्ही पर्वे तुफान गाजली. रात्रीस खेळ चाले-३ ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली असून आता मालिकेत पुढे काय घडणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. अण्णा नाईकांच्या पापामुळे त्यांना आणि त्यांच्या पुढच्या पिढीला अतृप्त आत्म्यांनी दिलेले शाप भोगावे लागले. अण्णा नाईकांच्या पुढच्या पिढीची वाताहात लागली. अतृप्त आत्म्यांनी नाईक वाड्याचा ताबा घेतला. एक नांदतं घर बघता बघता रसातळाला गेलं. पण या आलेल्या वादळात अण्णा नाईकांची बायको इंदू म्हणजेच माई घराण्याच्या मूळ पुरुषावर आणि कुलदैवतेवर भार टाकून सगळ्या संकटांशी शेवटपर्यंत लढते. आपल्या उद्ध्वस्त झालेल्या घराण्याला शापमुक्त होण्यासाठी उ:शाप मिळवते. एक अशिक्षित स्त्रीसुद्धा आपला स्वाभिमान जपून, संपूर्ण घराला पुन्हा उभं करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगते आणि त्यात जिंकून दाखवते. आता लवकरच नाईकांचा वाडा शापमुक्त होणार आहे.


नुकतंच मालिकेत पाहिलं की, अण्णा वच्छीला सांगतात की, अण्णांनी मारलेली माणसं पण अतृप्त भुतं झाली आणि ती आता नाईकांचा बळी मागत आहेत. त्यावेळी वच्छी अण्णाला दोन पर्याय देते - मुक्ती किंवा शेवंता. पण शेवंता वाड्याबाहेरील अतृप्त भुतांना वाडा पेटवून द्यायला सांगते. तेव्हा वच्छी अण्णाला एक बळी द्यायचं कबूल करते. अण्णांच्या मागणीसाठी नाईकांच्या वाड्यावर घरातील बळी कोण जाणार? याबद्दल भीती निर्माण होते. माई देवघरात जाऊन कुटुंबासाठी बळी जायला मी तयार असल्याचं सांगते. पण माई बळी जाण्यासाठी जाते तेव्हा तिच्यावर काळी सावली येते. ही काळी सावली कोणाची? ही सावली माईंचं रक्षण करणार की घात? अतृप्त भुतांसाठी माईंचा बळी जाणार का? हे प्रेक्षकांना आगामी भागांत पाहायला मिळेल.

Comments
Add Comment

विठ्ठल रखुमाईचा आशीर्वाद घेत 'पुन्हा शिवाजीराजे भोसले'ची पहिली झलक प्रदर्शित

मुंबई : महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तब्बल ३४५ वर्षांनंतर पुन्हा एकदा परतणार आहेत, तेही एका

'माऊली माऊली'... आषाढी एकादशीच्या निमित्ताने अभिनेता रितेश देशमुखने दिल्या शुभेच्छा

मुंबई: दरवर्षी होणारी पंढरीची वारी यंदाही उत्साहात सुरु आहे. आज आषाढी एकादशी असून लाखो वारकरी पायी पंढरपूरात

"श्रीरंग" तर्फे गतिमंद विद्यार्थ्यांसाठी 'सितारे जमीन पर' सिनेमाचा विशेष खेळ

मुंबई : श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गतिमंद विद्यार्थ्यांसाठी लालबाग येथील जय हिंद सिनेमा गृहात आमिर खान

संत तुकारामांची भूमिका साकारणार अभिनेता सुबोध भावे...

'संत तुकाराम’ चित्रपटाच्या प्रमोशनची सुरुवात पुण्यातून सुरु झाली आहे. हा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी चित्रपटगृहात

आता विषय संपवा.. प्रेक्षक चिडले...

निलेश साबळे राशीचक्रकार शरद उपाध्याय यांच्या सर्व टीकांना प्रत्युत्तर दिल. यासाठी त्यांनी सोशल मीडियावर एक

शरद उपाध्याय यांच्या वक्तव्यावर निलेश साबळे यांचं मुद्देसूद प्रत्युत्तर...

शरद उपाध्याय यांच्या वक्तव्यावर निलेश साबळे यांचं मुद्देसूद प्रत्युत्तर... झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या'