
नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आज व्यापार वृद्धी आणि आर्थिक सहकार्यासंदर्भात करार झाला. दोन्ही देशांमध्ये करारावर सह्या झाल्या आहेत. या करारानुसार ऑस्ट्रलियन सरकार भारतीय उत्पादनांना कर आकारणीशिवाय आपल्या बाजारपेठा उपलब्ध करुन देणार आहे. यात भारतातील वस्त्रोद्योग, कातडी उद्योग तसेच दाग-दागिणे आणि क्रिडासाहित्य, ईलेक्ट्रिक वस्तू, फूटवेअर, फर्निचर, शेती उत्पादनांचा समावेश असणार आहे. या करारामुळे येत्या चार ते पाच वर्षात १० लाख नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे. त्यातही योगा प्रशिक्षक आणि भारतीय शेफना मोठ्या संधी असणार असल्याचे वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
भारत-ऑस्ट्रेलिया व्यापारवृद्धी आणि आर्थिक सहकार्याच्या करारावर भारताकडून वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष दोयल यांनी सही केली. तर, ऑस्ट्रेलियाच्या व्यापार आणि पर्यटन मंत्री डॅन टेहान यांनी सही केली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिश देखील या व्हर्च्युअल कार्यक्रमाला उपस्थित होते. भारताबरोबरचा व्यापार करार म्हणचे जगाला मोठ्या बाजारपेठेचं दार खुलं करणार असेल, असं ऑस्ट्रलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिश यांनी म्हंटलंय.
आतापर्यंत दोन्हा देशांमध्ये २७ अब्ज अमेरिकी डॉलरचा व्यापार होता, या करारामुळे व्यापार ४५ ते ५० अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत पोहचेल असा विश्वास पियुष गोयल यांनी व्यक्त केलाय. ऑस्ट्रेलियामध्ये लवकरच निवडणुका असणार आहेत. त्यामुळे अनेर वर्षांपासून रखडलेला फ्रि ट्रेड डिल चा करार आज झाला. चीनच्या बाजारपेठेवर ऑस्ट्रेलिया मोठ्या प्रमाणात अवलंबून होता. त्यामुळे भारतीय बाजारपेठ ऑस्ट्रलियासाठी महत्वाची मानली जातेय.
भारताबरोबरच ऑस्ट्रेलियातही नव्या रोजगार संधी उपलब्ध होतील, तसेच भारतीयांना मोठा फायदा आजच्या व्यापार आणि आर्थिक सहकार्य करारामुळे होणार आहे. अशी माहीती पियुष गोयल यांनी दिली.