Monday, March 24, 2025
Homeताज्या घडामोडीपेट्रोल बॉम्ब फेकणारी महिला दहशतवादी अटकेत

पेट्रोल बॉम्ब फेकणारी महिला दहशतवादी अटकेत

लश्कर-ए-तैय्यबा जिहादी संघटनेशी महिलेचे संबंध

श्रीनगर : जम्मू-काश्मिरातील सोपोर येथील सीआरपीएफच्या बंकरवर पेट्रोल बॉम्ब फेकणाऱ्या दहशतवादी महिलेला अटक करण्यात आलीय. हसीना अख्तर असे या महिलेचे नाव असून तिचा लश्कर-ए-तैय्यबा संघटनेशी संबंध आहे.

हसीना अख्तरने दोन दिवसांपूर्वी बुऱखा परिधान करून सोपोर येथील सीआरपीएफ बंकरवर पेट्रोल बॉम्ब फेकून पळ काढला होता. तिचे हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्यानंतर या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. लश्कर-ए-तैय्यबाशी संबंधित हसीना अख्तर ही यापूर्वीही दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होती. हसीना अख्तरवर उत्तर काश्मीरमधील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात तीन गुन्हे आधीच दाखल असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

पोलिसांनी सांगितले की, हसीना अख्तर ही लश्कर-ए-तैयबाची ओव्हरग्राउंड वर्कर म्हणून काम करत होती. इतकेच नाही तर तिच्या दुखतरन-ए-मिल्लत संघटनेच्या प्रमुख आसिया अंद्राबी हिचाही संबंध आला आहे. पोलिसांनी सांगितले की, हसिना अख्तर विरुद्ध हंदवाडा येथे 2019 मध्ये युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दहशतवादी संघटनेचे पोस्टर चिकटवल्याप्रकरणी हसिना अख्तरवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र नंतर जामिनावर बाहेर आली. नुकताच त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -