Thursday, December 12, 2024
Homeताज्या घडामोडीराज्यात 'सीएनजी'-'पीएनजी' स्वस्त

राज्यात ‘सीएनजी’-‘पीएनजी’ स्वस्त

मुंबई परिसरात सीएनजी प्रतिकिलो ६ रुपयांनी स्वस्त,

पाईपद्वारे स्वयंपाक गॅस प्रति एससीएम ३.५० रुपये स्वस्त

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील ‘सीएनजी’, ‘पीएनजी’सारख्या नैसर्गिक गॅसवरील मुल्यवर्धीत कराचा (‘व्हॅट’) दर आज १ एप्रिल पासून १३.५ टक्क्यांवरुन ३ टक्क्यांपर्यंत कमी झाल्याने राज्यात घराघरांमध्ये पाईपद्वारे मिळणारा स्वयंपाकाचा गॅस तसंच वाहनांसाठीचे सीएनजी इंधन स्वस्त झाले आहे.

महानगर गॅसने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार मुंबई आणि परिसरात सीएनजी प्रतिकिलो ६ रुपयांनी स्वस्त झाला आहे. तर पीएनजी हा पाईपद्वारे स्वयंपाकाचा गॅस प्रति एससीएम (स्टॅन्डर्ड क्युबिक मीटर) ३ रुपये ५० पैशांनी स्वस्त झाला आहे. नवीन दराप्रमाणे मुंबई परिसरात सीएनजी ६० रुपये प्रति किलो तर पीएनजी ३६ रुपये प्रति एससीएम असेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -