Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीकमर्शिअल सिलेंडरच्या दरात २५० रुपयांची वाढ

कमर्शिअल सिलेंडरच्या दरात २५० रुपयांची वाढ

नवी दिल्ली : देशात एलपीजीच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. इंधन कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 250 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे 19 किलोचा गॅस सिलेंडर आता 2,253 रुपयांचा झाला आहे. परंतु, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे घरगुती एलपीजी सिलिंडर ग्राहकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. सुमारे 10 दिवसांपूर्वी घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर वाढवण्यात आले होते, तर 22 मार्च रोजी व्यावसायिक सिलेंडर स्वस्त झाले होते.

प्रदीर्घ कालावधीनंतर 22 मार्चपासून पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी ग्राहकांना महागाईचा धक्का बसला. या दिवशी विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडर 50 रुपयांनी वाढला आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 6 ऑक्टोबर 2021 पासून कोणताही बदल झालेला नाही. तर आज, शुक्रवारी नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशीही, घरगुती एलपीजी सिलेंडर दिल्लीत 949.50 रुपये, कोलकात्यात 976 रुपये, मुंबईत 949.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 965.50 रुपये आहे. दिल्लीत 1 मार्च रोजी 19 किलोचा एलपीजी सिलेंडरचे दर 22 मार्च रोजी 2003 रुपयांपर्यंत खाली आले. मात्र आजपासून ते दिल्लीत पुन्हा भरण्यासाठी 3353 रुपये खर्च करावे लागतील. त्याचबरोबर कोलकात्यात 2087 ऐवजी आता 2351 रुपये आणि मुंबईत 1955 ऐवजी 2205 रुपये आजपासून खर्च करावे लागणार आहेत. चेन्नईमध्ये आता त्याची किंमत 2138 रुपयांऐवजी 2406 रुपये असेल.

गेल्या 1 मार्च रोजी 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरचे दर 105 रुपयांनी वाढले होते आणि 22 मार्च रोजी 9 रुपयांनी स्वस्त झाले होते. त्याच वेळी, ऑक्टोबर 2021 ते 1 फेब्रुवारी 2022 दरम्यान, व्यावसायिक सिलेंडरची किंमत 170 रुपयांनी वाढली आहे. 1 ऑक्टोबर रोजी दिल्लीत व्यावसायिक किंमत 1736 रुपये होती. नोव्हेंबर 2021 मध्ये ते 2000 झाले आणि डिसेंबर 2021 मध्ये 2101 रुपये झाले. यानंतर, जानेवारीमध्ये ते पुन्हा स्वस्त झाले आणि फेब्रुवारी 2022 ला ते स्वस्त झाले आणि 1907 रुपयांवर आले. यानंतर 1 एप्रिल 2022 रोजी तो 2253 रुपयांवर पोहोचला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -