Wednesday, April 23, 2025
Homeदेशईशान्य भारतातील राज्यसभेच्या चारही जागांवर भाजपचा कब्जा

ईशान्य भारतातील राज्यसभेच्या चारही जागांवर भाजपचा कब्जा

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी बाजवणाऱ्या भारतीय जनता पक्षाने राज्यसभा निवडणुकीतही विजयाचे सातत्य राखले आहे. ईशान्य भारतातील राज्यसभेच्या चारही जागांवर गुरुवारी झालेल्या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला आहे. इशान्य भारतातून पहिल्यांदाच काँग्रेसला राज्यसभेत प्रतिनिधीत्व मिळालेले नाही.

भाजपने संख्याबळाच्या जोरावर त्रिपुराची आणि नागालँडची जागा बिनविरोध जिंकली. आसाममधील क्रॉस-व्होटिंग आणि अवैध विरोधी मतांमुळे भाजप आणि त्याचा सहकारी युपीपीएल यांना निवडणुका झालेल्या दोन्ही जागा जिंकण्यास मदत झाली. यासंदर्भात आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, आमची रणनिती आमदारांच्या विवेकावर विश्वास ठेवण्याची होती. आम्हाला काँग्रेस आमदारांची सात मते मिळाली आहेत. 126 सदस्यीय विधानसभेत, भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना राज्यसभेच्या दोन्ही जागा चार मतांनी जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या मतांपेक्षा कमी पडल्या. एक जागा सहज विरोधी पक्षाकडे जाऊ शकली असती.

आसाममध्ये भारतीय जनता पार्टी आणि यूपीपीएलने प्रत्येकी एक जागा जिंकली आहे. दुसरीकडे, काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान राज्यसभा खासदार रिपून बोरा, जे सामान्य विरोधी पक्षाचे सर्वसाधारण उमेदवार होते, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. एनडीएकडे आता या प्रदेशातून राज्यसभेत 14 पैकी 13 जागा आहेत. आसाममध्ये एक जागा अपक्षांकडे आहे. त्रिपुरामध्ये सीपीआय(एम)ने जागा गमावली. त्रिपुरामध्ये भाजप उमेदवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माणिक साहा यांनी सीपीएमचे उमेदवार विद्यमान आमदार भानू लाल साहा यांचा पराभव करून विजय मिळवला. आसाममधील राज्यसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या मतमोजणीला निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर 5 तासांपेक्षा जास्त उशीर झाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -