नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 1335 नवीन रुग्ण आढळले असून 52 जणांचा मृत्यू झाला आहे. काल कोरोनाचे 1225 रुग्ण नोंदवले गेले आणि 28 जणांचा मृत्यू झाला होता.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी दिवसभरात देशात 1918 लोक बरे झाले होते. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 13 हजार 672 झाली आहे. कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 21 हजार 181 झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 90 हजार 922 लोक संसर्गमुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत 4 कोटी 30 लाख 25 हजार 775 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे 184 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. गुरुवारी दिवसभरात 23 लाख 57 हजार 917 डोस देण्यात आले. देशात आतापर्यंत 184 कोटी 31 लाख 89 हजार 377 डोस लसीचे देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना 2 कोटींहून अधिक कोरोना लसी देण्यात आल्या आहेत.