Monday, July 15, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणसिंधुदुर्गात बैलांच्या झुंजीत बैलाचा दुर्दैवी अंत!

सिंधुदुर्गात बैलांच्या झुंजीत बैलाचा दुर्दैवी अंत!

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस अधिक्षक कार्यालयापासून काही किलोमीटर वर २८ मार्च दरम्यान झालेल्या बैलांच्या “कोकण किंग” या अनधिकृत झुंज स्पर्धेदरम्यान वेंगुर्ले तालुक्यातील “बाबू” नावाच्या देखण्या बैलाचा दुर्दैवी अंत झाला. या स्पर्धेत कुडाळचा ”अर्जून” नावाचा बैल विजयी ठरला. या स्पर्धेला झालेली तुफान गर्दी व बैलांच्या झुंजी वर बंदी असताना देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी मध्ये चाललेली स्पर्धा पोलीस प्रशासनाचा नजरेआड कशी राहिली? व या अनधिकृत स्पर्धेमध्ये अतिशय देखण्या व नावाजलेल्या “बाबू” या बैलाच्या झालेला मृत्यूला जबाबदार कोण? असे एक ना अनेक सवाल आता उपस्थित केले जात आहेत.

या झुंजीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्राणीप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे. या झुंजीच्या व्हिडिओमध्ये रक्तबंबाळ स्थितीत “बाबू” या बैलाची अवस्था पाहूनही अनेकांनी ही झुंज सोडवण्याऐवजी या स्थितीत देखील बाबू व अर्जुन मधील झुंज वाढण्यासाठी हुल्लडबाजी केली. ती पाहता या सर्वांवर कारवाई होणार का? या मुक्या प्राण्यांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार या सर्वांना कोणी दिला? पोलीस अधीक्षक या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देतील का? असा सवाल आता प्राणिमित्रातून उपस्थित केला जात आहे.

२८ मार्च ला मालवण तालुक्यातील एका गावामध्ये झालेल्या या स्पर्धेदरम्यान घडलेला हा प्रकार व्हिडिओच्या माध्यमातून समोर आला. आणि एकूणच चाललेल्या जिल्ह्यातील या अनधिकृत स्पर्धेमुळे एका देखण्या “बाबू” या बैलाचा बळी गेला. या झुंजीच्या दरम्यान ‘बाबू’ या बैलाला उत्तेजक द्रव्य इंजेक्शन मधून दिल्याची चर्चा समोर येत आहे. कारण काही असो पण चुकीच्या पद्धतीने मनोरंजना करीता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘बाबू’ नावाचा बैलासारखा एक चांगला हिरा गमावल्याची खंत प्राणीप्रेमी मधून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे एकूणच झालेल्या या सर्व गैरप्रकाराबद्दल पोलीस अधीक्षक लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करतील का? असा सवाल आता प्राणीप्रेमी मधुन उपस्थित केला जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -