"रशिया-युक्रेन युद्धासाठी मोदी सरकार जबाबदार"

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विविध मुद्द्यांवरून आपल्या भाषणांतून सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. रशिया आणि युक्रेनमधील वाद आणखी चिघळला असून तिथे गेल्या महिन्याभरापासून युद्ध सुरू आहे. यावरून आता रशिया आणि युक्रेनमधील युद्धासाठी ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारलाच जबाबदार धरले आहे. याच दरम्यान भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा एक व्हिडीओ पोस्ट करून एक चिंता व्यक्ती केली आहे.


सुवेंदू अधिकारी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केले आहे. त्यांनी ममता बॅनर्जींचा एक व्हिडीओ देखील ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये ममता बॅनर्जी मोदी सरकारला म्हणत आहेत की, "रशिया युक्रेनमधलं युद्ध सुरू करण्यापूर्वी तुम्ही विचार करायला हवा होता की आमची विद्यार्थी युक्रेनमधून परत येतील, तेव्हा कुठे खातील, कुठे जातील, त्यांचा अभ्यास कसा सुरू ठेवतील? तुम्ही केवळ पोकळ आश्वासने देत आहात."


भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनी ह्या व्हिडीओसोबत केलेल्या ट्वीटमध्ये हे अकल्पनीय आहे, असे म्हटले आहे. त्यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनाही टॅग केलं आहे आणि ममता बॅनर्जी यांच्या या विधानाची दखल घेण्यास सांगितले आहे. त्यांच्यामते, या विधानामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम होऊ शकतो.


"हे अकल्पनीय आहे. माननीय ममता बॅनर्जी यांनी सर्व सीमा ओलांडल्या आणि रशिया युक्रेनच्या युद्धासाठी केंद्र सरकारला जबाबदार धरलं. त्यांनी असा विचार केला नाही का की हे शब्द देशाच्या विरोधात वापरले जाऊ शकतात? आपल्या परराष्ट्र धोरणावर आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर याचा परिणाम होऊ शकतो" असे अधिकारी यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे