Monday, July 22, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणरिफायनरी प्रकल्प तिथेच होणार - नितेश राणे

रिफायनरी प्रकल्प तिथेच होणार – नितेश राणे

सिंधुदुर्ग : नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिफायनरी प्रकल्पासाठी राजापूरमधील बारसू येथील जागेचा प्रस्ताव दिल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मात्र नाणार वगळून जिथे समर्थन आहे त्याच जागेवर रिफायनरी होणार असल्याचा दावा केला आहे.

नाणारच्या नागरिकांचा रिफायनरीला विरोध आहे. यामुळे नाणार वगळून जिथे समर्थन आहे, त्याच जागेवर रिफायनरी होणार आहे, अशी माहिती नितेश राणेंनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेट्रोलियम मंत्र्यांसोबत दिल्लीत बैठक होणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, देवेंद्र फडणवीस आणि रिफायनरीशी संबंधित सर्व लोकप्रतिधी या बैठकीत असतील, अशी माहिती नितेश राणेंनी दिली.

रिफायनरी प्रकल्पाला आता कोणाचाही विरोध राहिलेला नाही. बारसू वैगरे गावात रिफायनरी होणार असल्याची चर्चा शिवसेनेच्या काही नेत्यांनी आणि राज्य सरकारमधील काही मंत्र्यानी सुरू केली आहे. ती फक्त त्यांच्या पुरतीच मर्यादित आहे. नाणार नाव ऐवजी ग्रीन रिफायनरी असा उल्लेख असेल, असे नितेश राणे म्हणाले.

रिफायनरी संबंधित जेवढे पण लोकं आहेत, यांची बैठक होणार आहे. केंद्रीय मंत्री राणे साहेबही असतील. आम्ही पण कोकणातून दिल्लीला जाणार आहोत. संयुक्त बैठक होणार आहे. नेमकी जागा कुठे ठरणार आणि कोणाकोणाचं समर्थन आहे. आणि कुठल्या गोष्टीची प्रकल्पाला गरज आहे, या सर्व मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होईल आणि रिफायनरीबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, असे नितेश राणे म्हणाले. नाणारचा विरोध असल्याने आम्ही आता नाणार रिफायनरी म्हणणार नाही. त्याल केंद्र सरकारच्या नियोजित प्रकल्पानुसार ग्रीन रिफायनरी असे म्हणणार असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.

प्रमोद जठार यांच्या नेतृत्वात लवकरच आम्ही दिल्लीला जाणार आहोत. देवेंद्र फडणवीस, राणे साहेब आणि सर्व संबंधित मंत्र्यांच्या नेतृत्वात लवकरच बैठक होईल आणि त्याची माहिती देण्यात येईल, असे नितेश राणे यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -