मुंबई : जेव्हा जेव्हा हिंदू सण येतात तेव्हा परवानगी देताना यांच्या हाताला लकवा मारतो का? असा प्रश्न भाजपाचे आमदार अशिष शेलार यांनी उपस्थित करत पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर गुढीपाडव्याच्या कार्यक्रमावरून निशाणा साधला आहे.
राम भक्तांवर ठाकरे सरकारचा काय राग आहे कळत नाही. गुढीपाडवा नववर्षाच्या शोभा यात्रा निघतात. तसेच राम जन्माला देखील मिरवणूका निघतात पण याच्या परवानगीची सष्टता नसल्याचं शेलारांनी म्हटलं. मुंबई पोलिसांनी 10 मार्च ते 8 एप्रिल पर्यंत जमावबंदीचे आदेश दिले आहेत. आतंकवादी ड्रोन किंवा अन्य माध्यमांचा वापर करून हल्ला करणार आहे, असं कारण देण्यात आलं आहे. 10 मार्च ते 8 एप्रिल 144 कलम लावण्यात आलं आहे.
शिवसेना कार्यक्रम करते तेव्हा ही कारणं येत नाहीत. हॅप्पी ट्रीट आणि वांद्रे वंडर लँड चालतं. मात्र, गुढीपाडवा चालत नाही. यापुढे आम्ही हे चालू देणार नाही, असं अशिष शेलार यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी मुंबईतील नालेसफाईत झालेल्या भ्रष्टाचारावर टीका केली. मुंबईत आम्ही ताकदीने सेवा करायचं ठरवलं आहे.
मुंबईतील सर्व नाल्यावर भाजप नालेसफाईची पाहणी आणि सुरुवात करणार आहे, असं शेलार म्हणाले. सत्ताधारी शिवसेनेनं हात झटकून दिले आहेत आणि प्रशासन हातावर हात धरून बसेल आहेत. आम्ही दोघांवरही नजर ठेऊन असल्याचे त्यांनी सांगितले.