Saturday, March 15, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेशिवाजी महाराज हेच सर्व लष्कराचे दैवत - निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर

शिवाजी महाराज हेच सर्व लष्कराचे दैवत – निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर

ठाणे : शत्रूच्या मनात नेहमीच आपल्याविषयी भितीयुक्त आदर असला पाहिजे. जरूर पडल्यास अशाप्रकारे आपल्या भ्याड शत्रूवर सर्जिकल स्ट्राईकची पुनरावृत्ती करण्यास भारत मागे पुढे पाहणार नाही, असे म्हणत छत्रपती शिवाजी महाराज हेच सर्व लष्कराचे दैवत असल्याचे लष्कराचे निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी सांगितले. ते कॉलेज ऑफ क्लब लीडर्स या संस्थेच्या ठाणे येथील यावर्षीच्या तिसऱ्या सभेमध्ये “उरी द सर्जिकल स्ट्राईक २०१६” या विषयावर बोलत होते. निंभोरकर हे प्रत्यक्ष प्रतीहल्यात भाग घेतलेले उरी ते बालाकोट सर्जिकल स्ट्राइक ते एअर सर्जिकल स्ट्राइक ब्रेन, सर्जिकल स्ट्राइक प्रमुख होते.

लष्करामध्ये शिस्त, आत्मविश्वास व अंतिम ध्येय गाठण्यासाठी कसे नियोजन केले जाते, ते उरीच्या सर्जिकल स्ट्राईकचे उदाहारण देतानाच आपले लष्कर किती सज्ज, कर्तव्यदक्ष व जिगरबाज आहे, याची अनेक उदाहरणांसह निंभोरकर यांनी प्रचिती दिली. काश्मीरच्या आजच्या परिस्थितीबद्दल बोलताना त्यांनी एक शेर ऐकवला “लम्होंने खता की ओर सदियोंने सजा पाई”

हा कार्यक्रम ऑफलाईन व ऑनलाईन आयोजित करण्यात आला होता. या माध्यमातून ४,५०० जणांचा याला प्रतिसाद मिळाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -