Tuesday, July 1, 2025

छगन भुजबळ यांच्याकडून नगरपालिका अधिकारी व कंत्राटदारांची झाडाझडती

छगन भुजबळ यांच्याकडून नगरपालिका अधिकारी व कंत्राटदारांची झाडाझडती

नाशिक : येवला शहरात सुरू असलेल्या विकास कामांबाबत नगरपालिका मुख्याधिकाऱ्यासह अधिकारी व कंत्राटदार यांच्यासमवेत एकत्रित बैठक आढावा घेऊन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांची झाडाझडती घेतली. यावेळी कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.अन्यथा कारवाई ला सामोरे जावे लागेल अशी तंबी त्यांनी अधिकारी आणि कंत्राटदारांना दिली.


पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला संपर्क कार्यालयात येवला शहर व परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांबाबत अधिकाऱ्यांसमवेत आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी येवला शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.


पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येवला शहारातील सांडपाणी भूमिगत गटार, सिमेंट काँक्रीटीकरण रस्ते, वाचनालय, व्यायामशाळा, शॉपिंग सेंटर, गार्डन, शहर स्वच्छता यासह सुरू असलेल्या विविध विकास कामांची प्रत्यक्षात पाहणी केली.


येवला शहरात सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी. कामाबाबत नागरिकांच्या कुठल्याही तक्रार येणार नाही याची दखल घ्यावी. रखडलेल्या अर्धवट कामे पूर्ण करण्यास दिरंगाई होत असेल तर खपवून घेतले जाणार नाही अशा इशारा देत कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.

Comments
Add Comment