Monday, July 22, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणआमदार नितेश राणेंसह ४१ जणांची निर्दोष मुक्तता

आमदार नितेश राणेंसह ४१ जणांची निर्दोष मुक्तता

२०१६ मधील डंपर आंदोलन प्रकरण

कणकवली (प्रतिनिधी): सहा वर्षांपूर्वीच्या डंपर आंदोलन प्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यासह ४१ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी रोटे यांनी राणेंसह ४१ जणांची निर्दोष मुक्तता केली.

४ मार्च २०१६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार नितेश राणे यांच्यासह उर्वरित कार्यकर्त्यांनी प्रशासन दखल घेत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून आंदोलन केले. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सर्वांवर गुन्हे दाखल करून अटक केली होती. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली होती. याबाबत येथील न्यायालयात खटला चालला. याकामी २० साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली होती. यामध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षक, तत्कालीन जिल्हाधिकारी यांचीही साक्ष नोंदवण्यात आली होती.

आंदोलनातील आंदोलनकर्ते आमदार नितेश राणे, सतीश सावंत, दत्ता सामंत, संग्राम प्रभुगावकर, संतोष कोदे, नझीर शेख, राधाकृष्ण पावसकर, अनिल नाईक, राजेश सावंत, दुर्गाप्रसाद स्वामी, योगेश राऊळ, शोएब शेख, अनंत मेस्त्री, स्वप्नील मिठबावकर, प्रदीप मांजरेकर, संतोष धुरी, महेश म्हाडळकर, रमेश वायंगणकर, संजय पालव, चंदन कांबळी, अक्षय सावंत मिलिंद मेस्त्री, राकेश म्हाडळकर, रुपेश जाधव, मुकुंद परब, राकेश परब, एकनाथ नाडकर्णी, संतोष नालंग, सिद्धेश परब, पंढरीनाथ हडकर, महेंद्र सांगेलकर, संतोष चव्हाण, हनुमंत बोंद्रे, आना भोगले, यशवंत सावंत, सुनील सावंत, सुशांत पांगम, अनील कांदळकर, शिवा परब, संतोष राऊत, दीपक खरात या ४१ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या सर्वांच्या वतीने अॅड. संग्राम देसाई, अॅड. राजेंद्र रावराणे, अॅड. अमोल सामंत डींगे यांनी काम पाहिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -