Saturday, July 13, 2024
Homeदेशदेशात १२५९ नवे कोरोना रूग्ण; ३५ जणांचा मृत्यू

देशात १२५९ नवे कोरोना रूग्ण; ३५ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासांत कोरोना साथरोगाचे 1259 नवीन रुग्ण आढळले असून 35 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 1270 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 31 जणांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी दिवसभरात देशात 1 हजार 705 लोक बरे झाले. यानंतर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 15 हजार 378 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 21 हजार 70 झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 85 हजार 534 रुग्ण कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत 4 कोटी 30 लाख 21 हजार 982 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे 13 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत. सोमवारी दिवसभरात लसींचे 25 लाख 920 हजार 407 डोस देण्यात आले. देशात आतापर्यंत कोरोना लसीचे 183 कोटी 53 लाख 90 हजार 499 डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना 2 कोटींहून अधिक (2 कोटी 27 लाख 30 हजार 34) प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. देशात कोविड विरोधी लसीकरण मोहीम 16 जानेवारी 2021 पासून सुरू झाली आणि पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -