Sunday, July 14, 2024
Homeदेशआता घरपोच मिळणार 'रेशन'

आता घरपोच मिळणार ‘रेशन’

भगवंत मान सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

हरियाणा : पंजाब सरकारने रेशनच्या घरपोच वितरणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं पंजाबमध्ये रेशनचे घरोघरी वितरण सुरू होईल, असे म्हटले आहे. दरम्यान, सरकार घरोघरी रेशन पोहोचवेल आणि हे काम अधिकारीच करतील, अशीही त्यांनी घोषणा केली आहे. ही योजना दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारने सुरू केली होती; पण केंद्र सरकारने दिल्लीत ही योजना बंद केली आहे.

सत्तेत आल्यापासून भगवंत मान एकापाठोपाठ एक मोठे निर्णय घेत आहेत. याआधी शुक्रवारी भगवंत मान यांनी आमदारांच्या पेन्शनमध्ये मोठा बदल करण्याची घोषणा केली होती. मान यांच्या म्हणण्यानुसार, आतापासून आमदारांना एकदाच पेन्शन मिळणार आहे. आत्तापर्यंत प्रत्येक वेळी आमदार झाल्यावर पेन्शनची रक्कम दिली जायची. इतकंच नाही तर आमदाराच्या कुटुंबीयांना मिळणारी पेन्शनही कमी करण्याची घोषणा मान यांनी केली आहे. या निर्णयामुळं जे कोट्यवधी रुपये वाचणार आहेत, ते गरीब कल्याणासाठी वापरणार असल्याचेही मान यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री मान यांच्या मोठ्या घोषणा

पंजाबमधील मंत्रिमंडळ विस्तारानंतरच्या पहिल्या बैठकीत भगवंत मान यांनी सरकारी विभागांमधील 25 हजार रिक्त पदं काढण्याची घोषणा केली होती.

पंजाबमध्ये दरवर्षी 23 मार्चला भगतसिंग यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. एवढंच नाही तर पंजाब विधानसभा संकुलात डॉ. भीमराव आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांचे पुतळे बसवण्याची घोषणा केली होती.

पंजाबमध्ये 35000 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यात येणार आहे.

पंजाबात लाच मागणाऱ्या सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या तक्रारींसाठी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी 9501200200 हा हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -