Friday, December 13, 2024
Homeमहत्वाची बातमी‘‘निर्देशांक रेंज बाऊंड स्टॉपलॉस आवश्यक’’

‘‘निर्देशांक रेंज बाऊंड स्टॉपलॉस आवश्यक’’

डॉ. सर्वेश सुहास सोमण

मागील आठवड्यात निर्देशांकात वाढ पाहावयास मिळाली. तसेच सोने या मौल्यवान धातूमध्ये उच्चांकापासून नफा वसुली पाहावयास मिळाली. कच्च्या तेलामध्ये देखील सोन्याप्रमाणे घसरण झाली. भारतीय शेअर बाजाराची सुरुवात या आठवड्यात नकारात्मक झाली. त्यानंतर दोन ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारांनी पुन्हा एकदा उसळी घेतली. मात्र शुक्रवारच्या सत्रात पुन्हा नफा वसुलीमुळे शेअर बाजारामध्ये पुन्हा घसरण पाहावयास मिळाली. या संपूर्ण आठवड्यात निर्देशांक निफ्टीने १७४४२ हा उच्चांक नोंदवला, तर १७००६ हा नीचांक नोंदवला. आपण आपल्या मागील लेखातच १७००० ही अत्यंत महत्त्वाची खरेदीची पातळी आहे हे सांगितले होते. निफ्टीने या आठवड्यात १७००० ने तोडता तिथूनच पुन्हा एकदा तेजी दाखवली. पुढील आठवड्याचा विचार करता निफ्टीची १७४५० ही अत्यंत महत्त्वाची विक्रीची पातळी असून १७००० ही खरेदीची पातळी आहे. टेक्निकल अॅनालिसिसनुसार विचार करता निर्देशांक हे आत्ता रेंज बाऊंड अवस्थेत अडकलेले आहेत. जोपर्यंत निर्देशांक या अवस्थेतून बाहेर पडत नाहीत तोपर्यंत मोठी तेजी किंवा मोठी मंदी होणार नाही. मी माझ्या मागील लेखात सांगितल्याप्रमाणे निर्देशांकामध्ये हेड अँड शोल्डर फॉर्मेशन सांगणारी मंदीची रचना तयार झालेली आहे त्यामुळे काळजीपूर्वक व्यवहार करणे आवश्यक आहे. अल्प मुदतीचा विचार करता जोपर्यंत निर्देशांकात १७००० या पातळीच्या वर आहेत तोपर्यंत तेजीचे संकेत देणाऱ्या शेअर्समध्ये तेजीचा व्यवहार करता येईल.

टाटा एलेक्सी, व्हीआयपी इंडस्ट्रीज लिमिटेड, पीव्हीआर, दालमिया शुगर यासह अनेक शेअर्स तेजीमध्ये आहेत. कमिन्स इंडिया लिमिटेड; या शेअरने मागील आठवड्यात १०६४ अत्यंत महत्त्वाची पातळी तोडत तेजी सांगणारी रचना तयार केलेली आहे. त्यामुळे आज १०८६ रुपये किमतीला असणाऱ्या या शेअरमध्ये अल्प तसेच मध्यम मुदतीमध्ये आणखी वाढ होणे अपेक्षित आहे. त्यामुळे ९९० रुपये किमतीचा बंद तत्त्वावर स्टॉप ठेवून या शेअरमध्ये तेजीचा व्यवहार केल्यास चांगला फायदा होऊ शकेल. आपण आपल्या मागील लेखात जेकेपेपर या शेअरने २८५ ही पातळी तोडत तेजी सांगणारी रचना तयार केलेली असून आज ३००.९० रुपये किमतीला असणाऱ्या या शेअरमध्ये अल्प तसेच मध्यम मुदतीत ६ ते ७ टक्क्यांची वाढ होऊ शकेल. असे सांगितलेले होते आपण सांगितल्यानंतर केवळ एकाच आठवड्यात ३२४.९० हा उच्चांक नोंदविला. टक्केवारी पाहावयाचे झाल्यास आपण सांगितल्यानंतर जेकेपेपरने ८ टक्क्यांची घसघशीत वाढ केवळ एका आठवड्यात दिलेली आहे. आपण आपल्या मागील लेखात सांगितल्याप्रमाणे शेअर बाजार हा नेहमीच भावनाशील असतो. थोड्या मोठ्या चांगल्या किंवा वाईट घटनेनंतर मोठ्या प्रमाणात वाढ किंवा घसरण दाखवत असतो. शेअर बाजारांमध्ये गुंतवणूक करीत असताना दीर्घ मुदतीचे शेअर्स निवडणे हे नेहमीच फायद्याचे ठरत आले आहे. आपण अल्प तसेच मध्यम मुदतीत गुंतवणूक करीत असताना बाहेरच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी कच्च्या तेलाचे भाव या अनेक गोष्टींचा परिणाम यावर होत असतो. मात्र दीर्घमुदतीसाठी गुंतवणूक करीत असताना म्हणजेच पुढील दहा वर्षांचा विचार करता गुंतवणूक करीत असताना मिळणारा परतावा हा नेहमीच जास्त असतो. आपण सांगितलेले होते आपण आपल्या लेखमालेतून एचडीएफसीएएमसी या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास दीर्घमुदतीत चांगला फायदा होऊ शकेल असे सांगितले आहे. “एचडीएफसी एएमसी” चे मार्केट कॅपिटल आज जवळपास ४७ हजार करोडचे असून फेस व्हल्यू ५ आहे. ही भारतातील मोठी “असेट मॅनेजमेंट” कंपनी असून यांचे मोठ्या प्रमाणात सेविंग आणि इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट आहेत. यांच्या जवळपास २३ इक्विटी संलग्न स्कीम्स आहेत. या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कंपन्या आणि एकूण कस्टमर यांचा विचार करता एकूण कस्टमरपैकी जवळपास २७ टक्के कस्टमर हे एकट्या “एचडीएफसी एएमसी” या एका कंपनीचे आहेत. मागील काही वर्षांत त्यांच्या रिझर्व्हमध्ये देखील चांगली वाढ होताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे सातत्याने प्रत्येक वर्षी चांगला डिव्हिडंट ही कंपनी देत आहे. टेक्निकल चार्टनुसार या शेअरमध्ये उच्चांकापासून ४२ टक्क्यांची घसरण या कंपनीच्या शेअरमध्ये झालेली आहे. त्यामुळे आज २२३८ रुपये किमतीला असणाऱ्या या शेअरमध्ये पुढील १० वर्षांचा विचार करता चांगला फायदा होणे अपेक्षित आहे. एचडीएफसीएएमसीमध्ये खरेदी करताना टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. कंपनीच्या प्रॉफिटमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यांचे रिझर्व्ह आणि सरप्लस, लायबिलिटी हे सगळे पाहता कंपनी जवळपास डेट फ्रीच आहे. एचडीएफसीएएमसी यांच्या बिजनेसमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. ही कंपनी गेल्या अनेक वर्षं सातत्याने चांगला डिव्हिडंड परतावा देखील देत आहे. पुढील काळाचा विचार करता पुढील दहा वर्षांमध्ये हा शेअर ४५०० ते ५००० रुपये किमतीपर्यंत वाढ दाखवू शकतो. कमोडिटी मार्केटमध्ये सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूमध्ये मर्यादित वाढ झाली. पुढील काळाचा विचार करता सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंची दिशा असून जोपर्यंत सोने ५११०० या पातळीच्या वर आहेत, तोपर्यंत सोन्यामध्ये आणखी वाढ होणे अपेक्षित आहे. सोन्याची ५२८०० ही अत्यंत महत्त्वाची पातळी असून, ज्यावेळी सोने ही पातळी तोडेल. त्यानंतर सोन्यांमध्ये आणखी मोठी वाढ होईल.

टेक्निकल अॅनालिसिसनुसार, कच्चे तेल अजूनही तेजीत असून जोपर्यंत कच्चे तेल ७१०० या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत कच्च्या तेलात आणखी वाढ होऊ शकते हे सांगितलेले होते. त्यानंतर एकाच आठवड्यात कच्च्या तेलात आणखी विक्रमी वाढ होत कच्च्या तेलाने ९९९६ हा नवीन उच्चांक नोंदविला. पुढील आठवड्यासाठी मध्यम मुदतीच्या चार्टनुसार कच्च्या तेलाची ७४०० ही खरेदीची पातळी असून जोपर्यंत कच्चे तेल ७००० या पातळीच्या वर आहे तोपर्यंत कच्च्या तेलातील तेजी कायम राहील.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -