सर्व खाजगी शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविणे बंधनकारक – वर्षा गायकवाड

Share

मुंबई : राज्य आणि केंद्रीय आदी शिक्षण मंडळाच्या खासगी शाळांमध्ये सीसी टीव्ही बसवण्याचे स्पष्ट निर्देश शुक्रवारी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत एका निवेदनाद्वारे दिले. येणारे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी हे सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यासाठीची कार्यवाही शाळांना करावी लागेल, असेही त्यात म्हटले आहे.

प्रत्येक शाळेत यापुढे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंद सकाळी आणि शाळा सुटण्यापूर्वी ठेवण्यात येईल. तसेच अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या पालकांना फोनद्वारे विचारणा करण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली. राज्यात सध्या खासगी व्यवस्थापनाच्या आणि विविध मंडळाच्या ४० हजार ४३ शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये सीसी टीव्ही बसविण्याची कार्यवाही झाली की नाही याची माहितीही शिक्षण विभागाकडून घेतली जाईल. यासाठी सखी-सावित्री समित्यांचे गठण व नियंत्रण याबाबतची जबाबदारी आयुक्तांची (शिक्षण) राहील. तसेच मुलींच्या मार्गदर्शनाची जबाबदारी एका महिला शिक्षकांवर देण्यात येईल.

राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसी टीव्ही बसविण्यासंदर्भात धोरण ठरविण्यात आले असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ६५ हजार शाळांंपैकी, सद्यस्थितीत १,६२४ शाळांमध्ये सीसी टीव्ही बसवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. उर्वरित शाळांमध्ये पुढील वर्षभरात सीसी टीव्ही बसवण्यात येणार असून यासाठीचा खर्च जिल्हा नियोजन व विकास निधी, स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधी, तसेच सीएसआर फंड किंवा लोकप्रतिनीधींच्या विकास निधीमधून करण्याबाबत सूचना देण्यात येतील, असेही त्या म्हणाल्या. यासोबत अज्ञात व्यक्तींच्या सूचनांचे, निर्देशांचे पालन करू नये याबाबत विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात येईल. प्रत्येक शाळेत तक्रारपेटी बसवण्याच्या सूचना देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Recent Posts

पुणे विमानतळावर १० रुपयांत चहा, २० रुपयांत कॉफी

पुणे : हवाई प्रवास करताना योग्य दरात आणि गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने पुणे…

27 minutes ago

भारत खरेदी करणार २६ मरीन राफेल फायटर्स

फ्रांन्सशी झाला ६४ हजार कोटी रुपयांचा करार नवी दिल्ली: भारत सरकार नौदलासाठी 26 राफेल मरीन…

41 minutes ago

Breaking News : पाकिस्तानी युट्यूब चॅनल बंदी नंतर सरकारचा ‘बीबीसीला’ इशारा

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तानात तणावपूर्ण वातावरण आहे. हे संबंध आणिखी ताणले जाऊ…

57 minutes ago

Raigad: रायगड जिल्ह्यात वणव्यांमुळे तीन हजार हेक्टर वनक्षेत्राची हानी

मागील पाच वर्षांत लागले एक हजार वणवे; ९० टक्के मानवनिर्मित; वनसंपदेला वाढता धोका अलिबाग :…

1 hour ago

पहलगाम अतिरेकी हल्ल्याचे दोन धक्कादायक व्हिडीओ

पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २५ हिंदू पर्यटक आणि एक स्थानिक…

2 hours ago